Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Crime News: ३५ वर्षीय विवाहित महिला सरकारी अधिकाऱ्याच्या प्रेमात; लॉजवर शरीरसंबंधही ठेवले, पण नंतर...; धक्कादायक घटना उघड

Crime News: ३५ वर्षीय विवाहित महिला सरकारी अधिकाऱ्याच्या प्रेमात; लॉजवर शरीरसंबंधही ठेवले, पण नंतर...; धक्कादायक घटना उघड

त्रपती संभाजीनगर: सोशल मीडियाच्या आभासी जगात मैत्री शोधणं एका ३५ वर्षीय विवाहित महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर प्रेमाचं नाटक करून एका उपअभियंत्याने महिलेवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी शहर पोलिसांनी हिंगोली येथे कार्यरत असलेल्या एका उपअभियंत्यावर गुन्हा दाखल केला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर उपअभियंता, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, आखाडा बाळापूर, जि. हिंगोली इथे कार्यरत होता.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उपअभियंत्याची पीडित महिलेशी जुलै २०२५ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. संवादाचे रूपांतर हळूहळू जवळीकीत झाले. त्यानंतर आरोपीने पीडितेशी लग्नाचं आमिष दाखवून प्रेमाचं नाटक रचलं. १६ जुलै रोजी आरोपीने पीडितेला कॉफी पिण्याच्या बहाण्याने बोलावले आणि आपल्या आलिशान कारमधून फिरवले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे पतीला धमकी

जेव्हा पीडितेने लग्नाचा तगादा लावला, तेव्हा आरोपीने आपलं खरं रूप दाखवलं. आरोपीने त्यांच्यातील व्हॉट्सॲपवरील खाजगी संभाषण पीडितेच्या पतीला पाठवण्याची धमकी दिली. जर तू कोणाला काही बोललीस, तर तुझे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, असं म्हणत त्याने पीडितेला वारंवार ब्लॅकमेल केलं. जुलै ते ऑक्टोबर २०२५ या दरम्यान हा शोषणाचा प्रकार सुरू होता.

सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल

आरोपीच्या सातत्यपूर्ण त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडितेने धाडस करत सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपअभियंता याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. उच्चशिक्षित आणि जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीनेच अशा प्रकारे कृत्ये केल्याने शासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims