Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Crime News: पतीची बॉडी बाथरुममध्ये पुरली, वर प्लास्टर; 45 दिवस सरले, दिराच्या हेरगिरीनं वहिनी अलगद अडकली

Crime News: पतीची बॉडी बाथरुममध्ये पुरली, वर प्लास्टर; 45 दिवस सरले, दिराच्या हेरगिरीनं वहिनी अलगद अडकली

लखनऊ: राहत्या घरात पतीला संपवल्यानंतर पत्नीनं त्याचं शव त्याच घरात लपवण्याचा कट रचला. खिरीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून तिनं पतीचा कायमचा काटा काढला. यानंतर घराच्या बाथरुममध्ये २ फूट खोल खड्डा खणला.

त्यात पतीचं शव पुरलं. यानंतर ती नातेवाईक, शेजाऱ्यांसमोर पती बेपत्ता झाल्याचं, त्याचा ठावठिकाणा सापडत नसल्याचं म्हणत अश्रू ढाळायची.

उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातील सिकंदरामध्ये राहणाऱ्या रुबीनं तिचा पती सुरेंद्र शर्माला अतिशय थंड डोक्यानं संपवलं. पतीचं शव तिनं घरात असलेल्या बाथरुममध्ये खड्डा खणून गाडलं. पती बेपत्ता झाल्याचा बनाव तिनं उभा केला. पोलिसांनी तपास केला. पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. तब्बल दीड महिना उलटला. रुबीनं नवऱ्याचा खून पचवला होता. पण तिच्या दिराच्या डोक्यात शंकांचं काहूर माजलं. याच संशयानं रुबीचा गुन्हा उघडकीस आणला.

पोलिसांचा तपास थंडावल्याचं पाहून अनिल कामाला लागला. त्यानं पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानं आईच्या पेन्शन खात्याचं बँक स्टेटमेंट काढलं. सुरेंद्रच्या मृत्यूबद्दल अनिल सातत्यानं त्याच्या वहिनीला प्रश्न करत होता. त्यानं २७ जूनला आईला स्वत:कडे नेलं. २९ जूनला तो आईला भरतपूरला घेऊन गेला. या ठिकाणी असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये आईचं पेन्शन खातं होतं. सुरेंद्र बेपत्ता झाल्यावरही त्याची पत्नी रुबी सातत्यानं पेटीएमच्या माध्यमातून आईच्या खात्यातून पैसे खर्च करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

सुरेंद्र सोबत घातपात झाल्याचा संशय अनिलला आला. त्यानं गुरुवारी सकाळी रुबीचं घर गाठलं. आईची पेन्शन तुम्ही घेतली. मला का नाही दिली? त्या पैशांचं काय केलं? काही लपवत असाल, तर मला सांगा. मी तुला वाचवेन, असं म्हणत अनिलनं वहिनीला विश्वासात घेतलं. माझा भाऊ कुठे आहे, त्याचं नेमकं काय झालं, अशी विचारणा अनिलनं केला. पण रुबी शांत राहिली.

दिराला संशय आला असून आता वाचणं अवघड असल्याची जाणीव रुबीला झाली. शुक्रवारी सकाळी ६ वाजता तिनं दिराला कॉल केला. पती घरीच आहेत. येऊन बोला, असं तिनं अनिलला सांगितलं. अनिल तातडीनं पोहोचला. सुरेंद्र कुठे आहे, असा प्रश्न केला. त्यावर बाथरुममध्ये असल्याचं उत्तर रुबीनं दिलं. अनिल बाथरुमकडे धावला. पण तिथे कोणीही नव्हतं. सुरेंद्र दोन फूट खाली आहे, असं रुबीनं म्हणताच अनिल हादरला. त्यानं तातडीनं पोलिसांना कॉल केला. यानंतर पोलिसांनी रुबीला अटक केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims