Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dahi Handi 2026: पुणेकरांसाठी महत्त्वाचे! 5 सप्टेंबरला दहीहंडीनिमित्त PMPLच्या मार्गांत बदल; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Handi 2026: पुणेकरांसाठी महत्त्वाचे! 5 सप्टेंबरला दहीहंडीनिमित्त PMPLच्या मार्गांत बदल; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या पर्यायी मार्ग

. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत शनिवारी (५ सप्टेंबर) दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) काही बसमार्गांच्या संचलनात तात्पुरते बदल केले आहेत.

रस्ते बंद झाल्यानंतर अनेक बस पर्यायी मार्गाने सुरू राहणार असून, स्वारगेट आगाराकडून चालविण्यात येणारे बसमार्ग क्रमांक तीन व सहा वर्तुळाकार स्वारगेट ते पुणे स्टेशन दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार पीएमपीने हे बदल केले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शक्य त्या मार्गावरून बससेवा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बसमार्ग क्रमांक १७ (नऱ्हे गाव-शिवाजीनगर) आणि ५० (शनिवारवाडा-सिंहगड) या बस रस्ते बंद झाल्यानंतर सारसबाग बसस्थानकावरून चालविण्यात येतील.

मार्ग क्रमांक ११३च्या (अ. ब. चौक-सांगवी) बस महापालिका भवन नदीकाठी असलेल्या बसस्थानकावरून सुरू राहतील. मार्ग क्रमांक ८, ९, ५७, ५७ब, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४अ, १४४क आणि २८३ या मार्गांच्या बस रस्ते बंद झाल्यानंतर डेक्कन जिमखाना, महापालिका भवन आणि गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने दोन्ही दिशेने धावतील. बससेवेतील या तात्पुरत्या बदलांची नोंद घ्यावी आणि पीएमपीला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्वारगेटकडे येताना पर्यायी मार्ग

मार्ग क्रमांक २, २अ, ११, ११अ, ११क, १३, २१, ३०, ३७, ३८, २१६, २९७, २९८, ३५४ आणि रातराणी -१ या बस शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रस्ता, डेक्कन आणि टिळक रस्त्याने धावतील. स्वारगेटकडून शिवाजीनगरकडे जाताना मात्र या बस बाजीराव रस्त्याने जातील . मार्ग क्रमांक ७ आणि २०२च्या बस तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजतानंतर ते चार सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत रस्ता बंद झाल्यानंतर दोन्ही दिशेने स्वारगेट आणि टिळक रस्त्याने धावतील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims