Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Daniel Balaji : 'मुलगाच हयात नाही तर 80 कोटींचा बंगला काय कामाचा' अभिनेत्याच्या निधनानं खचली आई, झोपडीत राहायला गेली

Daniel Balaji : 'मुलगाच हयात नाही तर 80 कोटींचा बंगला काय कामाचा' अभिनेत्याच्या निधनानं खचली आई, झोपडीत राहायला गेली

मुंबई - दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेते डॅनियल बालाजी आता आपल्यात नसले तरी, त्यांनी साकारलेल्या भूमिका लोक अजूनही विसरलेले नाहीत. मल्याळम चित्रपटांमधील नकारात्मक भूमिकांमधून त्यांनी मोठे नाव कमावलं.

डॅनियल यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांची आई दुःखात बुडाली आहे. २०२४ मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी डॅनियल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. डॅनियल यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांची आई दुःखात बुडाली आहे. डॅनियल बालाजी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या.

खलनायकाच्या भूमिका साकारल्या

डॅनियल हे निर्मात्यांची पहिली पसंती होते. जेव्हा कधी चित्रपटात खलनायकाची गरज भासायची, तेव्हा डॅनियल बालाजी यांच्यापेक्षा उत्तम कोणीही नाही, असा सर्वांचा विश्वास होता. ते आपल्या प्रत्येक भूमिकांमध्ये जीव ओतायचे आणि ती भूमिका पडद्यावर आकर्षकरित्या साकारायचे.




डॅनियल यांच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनावर एक अमिट छाप सोडली. डॅनियल यांनी २००२ मध्ये 'एप्रिल मथाथिल' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 'वेट्टैयाडू विळैयाडू', 'पोल्लादवन' आणि 'वाडा चेन्नई' यांसारख्या चित्रपटांनी त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. अभिनयापूर्वी त्यांनी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केलं होतं. कमल हासन यांचा 'मरुथुनायकम' हा चित्रपट त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीचा एक भाग होता. जरी हा चित्रपट प्रदर्शित झाला नसला, तरी याच काळात डॅनियल यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनमधून केली. त्यांना आध्यात्मिक बाबींमध्येही खूप रस होता आणि त्यांनी चेन्नईतील 'आवडी' येथे एक मंदिर बांधलं.

मुलाच्या मृत्युनंतर आई झोपडीत राहायला गेली

रिपोर्टनुसार, डॅनियल यांनी आपली आई राजलक्ष्मी यांच्यासाठी जवळपास ८० कोटी रुपये किमतीचा एक आलिशान बंगला बांधला होता. त्यांची आई याच घरात राहत होती, पण मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी ते घर सोडलं. त्या प्रशस्त बंगल्यात आपल्या मुलाशिवाय त्यांची आई राहू शकत नव्हती. बंगल्याचा प्रत्येक कोपरा त्यांना डॅनियलची आठवण करून देत होता. त्यामुळे, त्यांनी तो आलिशान बंगला सोडून आपल्या मुलाने बांधलेल्या मंदिराजवळील एका छोट्या झोपडीत राहण्यास सुरुवात केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims