मुंबई - 'देऊळ बंद २' प्रदर्शित होऊन १२ दिवस झाले आहेत. चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट लवकरच ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याच्या तयारीत आहे.
जाणून घेऊया सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन.
सॅकनिल्कनुसार, 'देऊळ बंद २' सिनेमानं १२ व्या दिवशी २.६० कोटी रुपये कमावले आहेत. सिनेमाची एकूण कमाई ४६.६५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा चित्रपट लवकरच ५० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल. 'देऊळ बंद २' ने ५४.८८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद २'ने पहिल्या दिवशी २.४ कोटी, दुसऱ्या दिवशी २.५५ कोटी, तिसऱ्या दिवशी ४.८५ कोटी, चौथ्या दिवशी ५.९ कोटी, पाचव्या दिवशी ३.४ कोटी, सहाव्या दिवशी ३.३५ कोटी, सातव्या दिवशी ३.३५ कोटी आणि आठव्या दिवशी ४.३५ कोटी कमावले.
चित्रपटानं पहिल्या आठवड्यात ३०.२० कोटी कमावले. 'देऊळ बंद २'ने नवव्या दिवशी ३.१० कोटी रुपये, दहाव्या दिवशी ५ कोटी रुपये आणि अकराव्या दिवशी ५.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सध्याचे ट्रेंड्स पाहता, 'देऊळ बंद २' चित्रपट १४ व्या किंवा १५ व्या दिवशी ५० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे. 'बाईपण भारी देवा' सिनेमानं १७ दिवसांत ५० कोटी रुपये कमावले होते, तर 'वेड'नं २१ दिवसांत ५० कोटी रुपये कमावले होते. आता, 'देऊळ बंद २'ची 'सैराट'सोबत स्पर्धा आहे.
'देऊळ बंद २' ची 'सैराट' सोबत चुरशीची स्पर्धा
सध्याचे ट्रेंड्स पाहता, 'देऊळ बंद २' चित्रपट १४ व्या किंवा १५ व्या दिवशी ५० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे. 'बाईपण भारी देवा' सिनेमानं १७ दिवसांत ५० कोटी रुपये कमावले होते, तर 'वेड'नं २१ दिवसांत ५० कोटी रुपये कमावले होते. आता, 'देऊळ बंद २'ची 'सैराट'सोबत स्पर्धा आहे.
सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'सैराट' - ८०.९७ कोटी
'बाईपण भारी देवा' - ७६ कोटी
'राजा शिवाजी' - ७० कोटी
'वेड' - ६१ कोटी
'देऊळ बंद २' - ४६.६५ कोटी (१२ दिवसांत)
दरम्यान, 'देऊळ बंद २' चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात प्रवीण तरडे, गश्मीर महाजानी आणि मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमाची निर्मिती प्रवीण तरडे आणि प्रणीत कुलकर्णी यांनी केली होती. दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे.

