Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Devendra Fadnavis :पुणे-चाकण परिसरात उद्योगांना बळ ; २,३२० कोटींची गुंतवणूक,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला विश्वास व्यक्त

Devendra Fadnavis :पुणे-चाकण परिसरात उद्योगांना बळ ; २,३२० कोटींची गुंतवणूक,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला विश्वास व्यक्त

.टा विशेष प्रतिनिधी,मुंबई:'चाकण-भोसरीच्या औद्योगिक पट्ट्यात नवी ऊर्जा देणाऱ्या ४९ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसोबतच्या (एमएसएमई) सामंजस्य कराराच्या माध्यमातून २ हजार ३२०.९७ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

या गुंतवणुकीतून उत्पादनक्षमता वाढण्यासोबतच हजारो रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होतील आणि ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातील औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल', असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.

नवी गती मिळणारे महाराष्ट्र हे देशाचे 'ग्रोथ इंजिन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे या संदर्भातील कार्यक्रम पार पडला. ''एमएसएमई'च्या बळावर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळणारे महाराष्ट्र हे देशाचे 'ग्रोथ इंजिन' आहे. देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. मोठ्या उद्योगांसाठी आवश्यक घटक, सुटे भाग, सेवा आणि विविध उत्पादनांचा पुरवठा करण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीत एमएसएमई क्षेत्राचा मोठा वाटा आहे.

'लोकल टू ग्लोबल'

त्यामुळे मोठ्या उद्योगांच्या विस्तारामागे एमएसएमई क्षेत्र मजबूत आधारस्तंभ म्हणून उभे आहे', असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.'पुणे आणि परिसरातील ऑटोमोबाइल व अभियांत्रिकी उद्योगांच्या परिसंस्थेत एमएसएमई उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. अनेक उत्पादनांच्या आयातीला पर्याय निर्माण करून 'लोकल टू ग्लोबल' वाटचालीला चालना देण्याचे काम एमएसएमई क्षेत्र करत आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या वाटचालीत आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. 'एमएसएमई' क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि वेगवान

'एमएसएमई सेन्सस'

विकास करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र व्यवस्था उभारली आहे. राज्यातील 'एमएसएमई' उद्योगांची संख्या, स्वरूप, रोजगारनिर्मिती, उत्पादनक्षमता आणि गरजा यांचा अचूक आढावा घेण्यासाठी 'एमएसएमई सेन्सस' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे अधिक परिणामकारक धोरणे आणि सुविधा निर्माण करता येतील', असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रत्यक्ष कामालाही गती

'गुंतवणुकीला केवळ कराराची नव्हे, तर प्रत्यक्ष उत्पादनाची गती मिळेल. सामंजस्य करार झालेल्या ४९ 'एमएसएमई' उद्योगांना आवश्यक जमीन, पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग आणि एमआयडीसी वेगाने कार्यवाही करणार आहेत. उद्योजकांना अधिक चांगल्या सुविधा, सक्षम पायाभूत व्यवस्था आणि उद्योगस्नेही वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे', असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शंभर अतिरिक्त सुरक्षा जवानांची नियुक्ती

पुणे : चाकण परिसरातील १९ गावे आणि 'एमआयडीसी' क्षेत्रासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवरही तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. औद्योगिक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी १०० अतिरिक्त सुरक्षा जवानांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

वाहनांसोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र मार्ग आणि सुरक्षित रस्त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बुधवारी चाकण परिसरातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims