Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Devichand Agrawal : अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर, केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचं निधन

Devichand Agrawal : अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर, केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचं निधन

बंडू येवले, पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. होणाऱ्या बायकोने प्रियकरासोबत लोहगड येथून ढकलल्याने तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचं निधन झाल्याची घटना ताजी असताना, आता अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मृतक केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद किशनलाल अग्रवाल यांचं निधन झालं आहे. नातव्याच्या हत्येच्या घटनेचा त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यांच्याकडून केतनला न्याय मिळावा यासाठी आंदोलनदेखील करण्यात आलं होतं. आपल्याच लोकांनी आपल्याला धोका दिल्याची भावना त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

देवीचंद अग्रवाल हे 83 वर्षांचे होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरु होते. नातवाच्या आठवणीत ते व्याकूळ झाले होते. आपल्या नातवासोबत घडलेल्या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसला होता. ते सातत्याने या घटनेचा विचार करत होते. या घटनेनंतर कुटुंबातील एकंदरीत परिस्थितीमुळे ते चिंतेत होते.

घरातील तरुण मुलाचे निधन झाल्याने देवीचंद अग्रवाल अस्वस्थ होते. केतनचा सिया गोयल हिच्यासोबत लग्न जमवल्याचा त्यांना पश्चात्ताप होत होता. याच विचारात ते आजारी पडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. पण दोन दिवस आयसीयूत उपचार घेतल्यानंतर त्यांची प्राणज्योत आज मालवली.

देवीचंद अग्रवाल कँडलमोर्चात झाले होते सहभागी

दरम्यान, 27 जून रोजी पुण्यातील गहुंजे इथे केतनला न्याय मिळावा यासाठी कँडलमार्च काढण्यात आला होता. या मोर्चात केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. "आम्हाला आमच्याच लोकांनी धोका दिला. ज्यांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखत होतो त्याच लोकांनी आम्हाला धोका दिला", अशी भावना देवीचंद अग्रवाल यांनी व्यक्त केली होती.

"सिया गोयल हिच्या कुटुंबियांनी तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे या लग्नाला जबाबदार असणाऱ्या सर्व लोकांची चौकशी करावी. आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळायला हवी", अशी भूमिका देवीचंद अग्रवाल यांनी व्यक्त केली होती.

केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. पण कोर्टाने ही मागणी फेटाळत आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जात आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims