Dailyhunt
Disha Danade : 'मला राखी सावंत खूप आवडते, तिच्या येण्यानं बिग बॉसला कलाटणी मिळालीये' 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य

Disha Danade : 'मला राखी सावंत खूप आवडते, तिच्या येण्यानं बिग बॉसला कलाटणी मिळालीये' 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य

मुंबई - बिग बॉस मराठीचं सहावं पर्व चांगलंच चर्चेत असून हे पर्व संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा कोण विजेता होणार? याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

बिग बॉसच्या स्पर्धकांचे प्रेक्षक चाहते असतातच, पण त्याचबरोबर अनेक कलाकारही स्पर्धकांचे चाहते असतात. बिग बॉसच्या स्पर्धकांना अनेक कलाकारही सपोर्ट करतात. अशातच आता 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनं बिग बॉसमधील राखी सावंतबद्दल भाष्य केलं असून, तिला राखी खूप आवडते असं म्हटलं आहे.

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात राखी सावंतने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. बिग बॉसच्या इतर स्पर्धकांचा गेम अजिबात दिसत नव्हता, त्यामुळे राखी सावंतनं बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली. बिग बॉसच्या घरात येताच राखीने सदस्यांमध्ये भांडण लावायला सुरुवात केली. राखी आणि रुचितामध्येही मोठा वाद झालेला पाहायला मिळाला. त्याचबरोबर राखी राकेशच्या प्रेमात होती, मात्र तू माझी चांगली मैत्रीण आहेस, असं राकेशनं तिला सांगितलं.

राखी सावंतबद्दल काय म्हणाली दिशा?

आता 'ठरलं तर मग' मालिकेत कुसुमची भूमिका साकारणाऱ्या दिशा दानडेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राखी सावंत तिची आवडती स्पर्धक असल्याचं म्हटलंय. 'अल्ट्रा मराठी बझ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिशा दानडे म्हणाली की, 'मला राखी सावंत खूप आवडते. म्हणजे तिच्या येण्यानं जी काही कलाटणी मिळालीये बिग बॉसला, या गेमला. म्हणजे, मी खरं सांगू! मी फार फॉलो नव्हते करत. मी खोटं नाही सांगणार, माझा मित्र आहे सागर, म्हणून मी बघायला लागले. पण, मध्ये-मध्ये होतं, पुढे काहीच घडत नाहीये. पण जशी राखी आली...त्सुनामी.'


'मला ती आवडते, ती बिग बॉसच्याच घरची आहे. एक स्पर्धक म्हणून मी तिच्याकडे बघतच नाही. ती अविभाज्य घटकच आहे बिग बॉसची.' असं दिशा पुढे म्हणाली.

दिशा दानडेच्या मालिका

दरम्यान, दिशा दानडेच्या कामाबद्दल सांगायचं तर तिला'ठरलं तर मग' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. सध्या ती मालिकेत दिसत नसली तरी लवकरच दिसणार असल्याचं तिनं सांगितलं आहे. त्याचबरोबर दिशा कलर्स मराठी वाहिनीवरील 'मी जिंकून घेईन सारं' या मालिकेमध्येही महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims