Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dnyanada Ramtirthkar : 'मी तुला धुम्रपान  करायला शिकवतो पण...' , ज्ञानदाच्या वडिलांनी ठेवलेली अट; काय होता नेमका किस्सा?

Dnyanada Ramtirthkar : 'मी तुला धुम्रपान करायला शिकवतो पण...' , ज्ञानदाच्या वडिलांनी ठेवलेली अट; काय होता नेमका किस्सा?

राठी मालिका विश्वात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ती स्टार प्रवाह वरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्या देशमुख हे पात्र साकारते.

यापूर्वीही अनेक उत्तम भूमिका साकारून ज्ञानदाने आपले नाव कमावले. केवळ मालिकांपुरत मर्यादित न राहता तिने सिनेमा, वेब सिरीज आणि नाटकांमध्येही अभिनय केला.

सध्याचा जमाना हा वेब सिरीजचा आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी भडकपणे दाखवल्या जातात. अभिनय क्षेत्रात काम म्हटलं की कलाकारांना अनेक गोष्टी या त्यांच्या मना विरोधात जाऊन केवळ कथेची गरज म्हणून कराव्या लागतात. बरेचदा अभिनेत्री यामध्ये भरडल्या जातात. टीव्हीवर किंवा सिनेमात इंटीमेट सीन्स किंवा धूम्रपणाच्या सीन्स वेळी त्यांना दडपणात काम करावे लागते कारण त्यावर येणाऱ्या घरच्यांच्या प्रतिक्रिया या सुद्धा महत्त्वाच्या असतात.

एका वेब सिरीज मध्ये ज्ञानदा रामतीर्थकर ला धुम्रपान करतानाचा सीन करायचा होता. यापूर्वी तिने कधीच सिगरेट ओढली नव्हती. आपण जर टीव्हीवर किंवा स्क्रीनवर सिगरेट ओढताना दिसलो तर आपल्या घरच्यांना काय वाटेल याची चिंता तिला वाटू लागली म्हणून तिने या सीन बाबत आपल्या घरच्यांशी बोलायचं ठरवलं. आजही ती कोणत्याही काम करताना त्या प्रोजेक्ट बद्दल पहिलं आपल्या घरच्यांना सांगते. त्यांच्या प्रतिक्रिया त्यावर काय आहेत हे तिच्यासाठी महत्त्वाचं असतं. जेव्हा तिने धूम्रपानाच्या सीन बद्दल सांगितलं तेव्हा तिच्या वडिलांनी तिला काही प्रश्न विचारले आणि समोर एक अट ठेवली.

ज्ञानगाचे बाबा तिला म्हणाले की हे वेब सिरीज वगैरे प्रकरण तर आम्हाला कळत नाही पण हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे असं तुला वाटतं? हे पात्र तुला आवडले का आता तुला काही मिळणार आहे का? असं विचारलं तेव्हा मी त्यांना हो असं म्हटलं. कारण त्यावेळी मैत्रीचा प्रकार अगदी नवीनच आलेला त्यामुळे मला त्यात काम करायचं होतं.



बी द लाइटला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानदाने पुढे सांगितले की, यावर मला माझ्या वडिलांनी सांगितलं की ठीक आहे कर तू पण धूम्रपान कसं करायचं हे मी तुला शिकवणार दुसऱ्या कोणाकडून तू शिकायचं नाहीस. हे घरात करायचं जे काही करायचं आहे ते तुला दुसरं कोणी नाही सांगणार. तुझं काम आहे आमच्या सगळ्यांचा तुला पाठिंबा आहे त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.

ज्ञानदाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिला ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच गेल्या वर्षी तिचा मुंबई लोकल हा सिनेमा रिलीज झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims