Dosa Batter: कुटुंबाने इडली-डोशाच्या पिठाला दोन चिमुकल्या बहिणींच्या मृत्यूस जबाबदार धरले असले, तरी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून विशेषतः बाहेरून खरेदी केलेल्या तयार डोसा पिठाच्या वापराबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत अन्न पटकन खराब होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे अशा काळात शक्य तितके ताजे आणि घरचेच अन्न खाण्याकडे कल देणे अधिक सुरक्षित ठरते.अशात तेजश्री डोखे यांनी डोसा इडलीच्या प्रिमिक्सची रेसिपी शेअर केली आहे.
गुजरातमधील Ahmedabad येथे झालेल्या दोन चिमुकल्या बहिणींच्या मृत्यूची घटना अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अवघ्या तीन महिन्यांची बाळ आणि चार वर्षांची तिची मोठी बहीण यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे अन्नसुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून विशेषतः बाहेरून आणलेल्या डोशाच्या पिठाच्या वापराबाबत चर्चा सुरू झाली आहे.प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबाने स्थानिक डेअरीमधून इडली-डोशाचे तयार पीठ रेडी बॅटर खरेदी केले होते. या पिठापासून तयार केलेले डोसे खाल्ल्यानंतर दोन्ही मुलींची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आई-वडील सुद्धा सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.तेजश्री डोखे यांनी डोसा-इडलीसाठी घरच्या घरी तयार करता येणाऱ्या प्रिमिक्सची सोपी आणि सुरक्षित रेसिपी सांगितली आहे.या उन्हाळ्यात शक्य असल्यास घरी तयार केलेल्या गोष्टी खा आणि स्वस्थ राहा. (फोटो सौजन्य :- @खाद्य प्रेमी) उन्हाळ्यात अन्न विषबाधा का वाढते?

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान जास्त असल्यामुळे अन्न पटकन खराब होण्याची शक्यता वाढते. विशेषतः आंबवलेले fermented पदार्थ जसे की डोशाचे पीठ, इडली बॅटर, दही इत्यादी योग्य प्रकारे साठवले नाहीत तर त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढू शकतात.
- यासाठी काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत
- उच्च तापमान - बॅक्टेरियाची वाढ वेगाने होते
- अयोग्य साठवणूक - फ्रिजमध्ये न ठेवणे किंवा जास्त वेळ बाहेर ठेवणे
- बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ - बाजारातील तयार बॅटरमध्ये कमी कॉलिटीचे असतात.
- स्वच्छतेचा अभाव - उत्पादन किंवा पॅकिंग प्रक्रियेत स्वच्छतेकडे दुर्लक्ष
डोसा पीठ कसे तयार करावे

- एक किलो तांदूळ
- चारशे ग्रॅम उडीद डाळ
- दोन कप पोहे
- अर्धा कप साबुदाणा
- चार चमचे मेथी दाणे
स्वच्छ धुणे

- तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवा
- उडीद डाळ आणि मेथी दाणे वेगळे धुवा
- साबुदाणा (जास्त धुवू नका, पदार्थ चिकट होतो)
पिठ तयार करा

दिलेल्या प्रमाणानुसार डोशाचे प्रिमिक्स तयार करण्यासाठी सर्व साहित्य योग्य पद्धतीने प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम एक किलो तांदूळ आणि चारशे ग्रॅम उडीद डाळ स्वच्छ धुऊन वेगवेगळे भिजवून घ्यावेत. नंतर उडीद डाळ पूर्णपणे पाणी काढून पॅनखाली किंवा सावलीत चांगली सुकवून घ्यावी. तांदूळही तसेच कोरडे करून घ्यावेत. पूर्णपणे सुकल्यानंतर तांदूळ आणि उडीद डाळ हलक्या आचेवर थोडे भाजून घ्यावेत, जेणेकरून त्यातील ओलावा निघून जाईल आणि साठवण अधिक दिवस टिकेल.
मिश्रणात इतर सामान टाका

पोहे, साबुदाणा आणि मेथी दाणे वेगळे घेऊन तेही मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावेत. पोहे हलके कुरकुरीत झाले पाहिजेत, साबुदाणा थोडा फुगून पारदर्शक दिसू लागतो आणि मेथी दाण्यांना हलका सोनेरी रंग येतो, तेव्हा ते तयार झाले असे समजावे. सर्व भाजलेले साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यावे.
पिठ तयार करा

थंड झाल्यानंतर हे सर्व साहित्य एकत्र करून गिरणीत किंवा मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्यावे. हे तयार झालेले प्रिमिक्स एअरटाइट डब्यात साठवून ठेवावे. वापरताना आवश्यक तेवढे पीठ घेऊन त्यात पाणी आणि मीठ घालून 6-8 तास आंबवून घ्यावे. असे तयार केलेले पीठ इडली आणि डोसा दोन्हीसाठी उत्तम लागते आणि त्यासाठी वेगळा सोडा घालण्याची गरज भासत नाही.

