मुंबई: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम आणि 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून ओळखला जाणारा मराठी सिनेविश्वातला लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.
गौरवने त्याची मैत्रीण प्रियांका कारेकर (Priyanka Karekar) हिच्याशी गुपचूप लग्नगाठ बांधली. त्यामुळं या दोघांच्या लग्नाबद्दल कळताच चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच होता. गौरव मोरेनं नुकतंच नवीन घरही घेतली.या नवीन घरातील दोघांचे फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळं मिसेस मोरे नेमक्या आहेत तरी कोण? असा प्रश्न चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे.
गौरव मोरेची पत्नी प्रियांका कारेकर ही देखील सिनेइंडस्ट्रीतच कार्यरत आहेत.ती एक अभिनेत्री असून तिनं अनेक हिंदी सिनेमांत काम केलंय.
कोण आहे गौरव मोरेची पत्नी प्रियांका कारेकर?
प्रियांका कारेकर स्वतः देखील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे. ती एक अभिनेत्री आहे. प्रियांकानं बॉलिवूडमध्येही काम केलंय. प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या 'चूप' (Chup: Revenge of the Artist) या चित्रपटात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सनी देओल आणि दुलकर सलमान मुख्य भूमिकेत होते.तरगौरव मोरेआणि प्रियांका गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि बराच काळ एकमेकांना डेट करत होते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अनेक कलाकारांसोबतचे फोटो व्हायरल
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनं दोघांचा खास फोटो शेअर करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर नम्रता संभेराव हिच्यासोबतही प्रियांकाचे फोटो आहेत.
'दुहेरी' आनंद
गौरव आणि प्रियांकासाठी हा काळ खूपच खास ठरला आहे. लग्नाच्या सोहळ्यासोबतच गौरवने मुंबईत स्वतःचं नवीन घर देखील खरेदी केलं आहे. लग्नानंतर या जोडप्यानं आपल्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. ऋतुजा बागवेने शेअर केलेल्या फोटोत गौरव आणि प्रियांका पारंपरिक वेशात दिसत असून प्रियांकाच्या हातातील हिरवा चुडा, मेहंदी आणि गळ्यातील मंगळसूत्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
