मुंबई - झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून मराठी अभिनेत्री गायत्री दातारला लोकप्रियता मिळाली. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे.
अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली असून तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गायत्री दातार अडकली लग्नबंधनात
गायत्रीनं लग्नासाठी खास गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली. त्यावर अभिनेत्रीनं हिरव्या रंगाचा चुडा घातलेला दिसतोय. तर गायत्रीच्या नवऱ्यानं सफेद रंगाची शेरवानी परिधान केली आहे. गायत्रीच्या लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर चाहत्यांनी अभिनेत्रीच्या आयुष्याच्या नव्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी गायत्रीनं ग्रहमख विधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले. त्यानंतर अभिनेत्रीच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटोही व्हायरल झाले.

कोण आहे गायत्री दातारचा नवरा?
अभिनेत्रीची लव्ह स्टोरी

