Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Girish Pardeshi Interview: १०-१५ हजार विद्यार्थ्यांमधून NSD साठी निवड; अन् गिरीश परदेशीला सापडला करिअरचा मार्ग, 'या सुखांनो या' मालिकेत अशी झालेली एन्ट्री

Girish Pardeshi Interview: १०-१५ हजार विद्यार्थ्यांमधून NSD साठी निवड; अन् गिरीश परदेशीला सापडला करिअरचा मार्ग, 'या सुखांनो या' मालिकेत अशी झालेली एन्ट्री

मुंबई: मराठी टीव्ही आणि सिनेइंडस्ट्रीतला देखणा चेहरा, उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता गिरीश परदेशी गेल्या १५ वर्षापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. 'या सुखांनो या', 'वहिनीसाहेब' यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि 'फॉरेनची पाटलीण' सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेल्या गिरीश परदेशी यानं 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइच्या सेलिब्रिटी कॉर्नर' या खास मुलाखतीत त्याचा प्रवास उलगडला आहे.

करिअर, मालिका,सिनेमांच्या सेटवरचे किस्से... त्यानं दिलखुलासपणे शेअर केले आहेत. तसंच गेल्या १० वर्षापासून तो कुठं होता, त्यानं सिनेइडंस्ट्रीतून ब्रेक का घेतला, याचा खुलासाही केलाय.

पॅशन म्हणून झाली करिअरची सुरुवात

तर अभिनयाची आवड असल्यानंच या क्षेत्रात आलो, असं गिरीशनं सांगितलं. पुण्यात कॉलेजला असल्यानं नाटकाची आवड तिथंच निर्माण झाली. त्यानंतर आता पुढं काय? असा प्रश्नही होता. माझ्या पुढे दोन मार्ग होते, एक तर सीए व्हायचं आणि दुसरं म्हणजे अभिनय क्षेत्रात काही तरी करायचं. अभिनय क्षेत्रात काम करायचं तर त्यासाठी पाया भक्कम हवा, पाठबळ हवं...नाही तर लोक तुम्हाला गांभीर्यानं घेणार नाहीत. तेव्हा मला कोणी तरी 'नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा'बद्दल सांगितलं. दिल्लीत अशी एक संस्था आहे, जिथं फार कमी लोकांना अभिनय शिकण्यासाठी संधी मिळते, शिष्यवृत्ती दिली जाते. देशभरातून १०-१५ हजारांतून २० विद्यार्थ्यांची निवड केली होती.


NSD बद्दल समजल्यानंतर आपणही प्रयत्न करून का बघू नये, असा विचार केला. आपण १०० टक्के देऊय, प्रयत्न करण्यात कुठे कमी पडायला नको...असं म्हणून मी परीक्षा दिली अन् सिलेक्टही झालो, असं गिरीशनं सांगितलं. NSD मध्ये निवड झाल्यानंतर आता दुसऱ्या करिअर क्षेत्रात काम करण्याचा प्रश्नच नव्हता, असंही तो म्हणाला.

'या सुखांनो या' मालिकेत झाली एन्ट्री

१९९८ साली मी NSD तून पासआऊट होऊन आलो. त्यानंतर स्ट्रगल सुरू होता, लोकांना भेटणं सुरू होतं. याच दरम्यान, शिल्पा नवलकर यांचा फोन आला. त्यांनी या सुखांनो या मालिकेच्या ऑडिनशसाठी विचारलं. यानंतर भाग्यविधाता मालिकेच्या सेटवर विरेंद्र प्रधान यांना भेटायला गेलो होते. तिथंच ऑडिशनही झालं. त्यानंतर त्यांनी लगेचच 'भेटू लवकरच' असं म्हटलं. यावरून निवड झाल्याचं लक्षात आलं होतं...असा हा खास किस्सा गिरीशनं सांगितला.

'या सुखांनो या' मालिकेतील कलाकारांसोबत काम करत असताना आम्ही एक कुटुंबच झालो होतो, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं होतं, असंही गिरीशनं म्हटलं. तर विक्रम गोखले यांच्यासोबत काम करताना सुरुतीला थोडं दडपणही होतं, असंही त्यानं सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims