Dailyhunt
Girl Missing: ट्रेकिंगला गेलेली इंजिनिअर तरुणी बेपत्ता, मोबाईल सिग्नल गायब; 48 तासांनंतरही गूढ कायम

Girl Missing: ट्रेकिंगला गेलेली इंजिनिअर तरुणी बेपत्ता, मोबाईल सिग्नल गायब; 48 तासांनंतरही गूढ कायम

तिरुअनंतपुरम: ट्रेकिंगला गेलेली तरुणी बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ट्रेकिंगला गेलेली तरुणी परत न आल्यानं पोलिसांना माहिती देण्यात आली. मुसळधार पाऊस, दुर्गम रस्ते, जंगली हत्तींचा धोका या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत पोलीस, वन विभाग आणि श्वान पथकांच्या मदतीनं तरुणीचा शोध सुरु आहे.

तरुणी सुरक्षित माघारी परतावी, यासाठी सगळ्यांच्या प्रार्थना सुरु आहेत. ही घटना केरळच्या मदिकेरीतील ताडियांडामोलच्या डोंगराळ प्रदेशात घडली आहे.

कोडागु जिल्ह्यातील मदिकेरी तालुक्यात कक्काब्बे गावाजवळ ट्रेकिंगला गेलेली तरुण एकाएकी बेपत्ता झाल्यानं पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. केरळचीच रहिवासी असलेली शरण्या जीएस ताडियांडामोलच्या डोंगराळ भागात ट्रेकिंगला गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता आहे. खासगी होमस्टेमध्ये थांबलेल्या शरण्यानं ट्रेकिंगला जाण्याचा प्लान केला होता. ती एकटीच ट्रेकिंग जाणार होती. पण त्या भागात असलेला जंगली हत्तींचा वावर पाहता, त्यांच्याकडून असलेला धोका लक्षात घेता होमस्टेच्या कर्मचाऱ्यांनी तिला अन्य काही जणांसोबत ट्रेकिंगला जाण्याचा सल्ला दिला. संध्याकाळ होऊनही शरण्या माघारी परतली नाही. यानंतर पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिचा शोध सुरु केला.

वन विभागाचे ५० हून अधिक कर्मचारी शरण्याच्या शोधात आहेत. त्यांच्या सोबत पोलीस कर्मचारीदेखील आहेत. मध्यरात्री ३ पर्यंत शोध मोहीम राबवूनही त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही. शरण्याचा ठावठिकाणा अद्याप हाती लागलेला नाही. शरण्यानं काल होमस्टेच्या मालकाला कॉल केला होता. मी रस्ता चुकलेय, असं तिनं होमस्टेच्या मालकाला सांगितलं.

यानंतर शरण्याचा मोबाईल बंद झाला. तिच्याशी संपर्क होत नाहीए. एकटीच फिरायला आलेली शरण्या नऊ जणांसह ट्रेकिंगला गेली होती. शरण्या कुत्र्यांसोबत खेळताना मागे राहिली आणि ग्रुपपासून वेगळी झाल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर शरण्या बेपत्ता झाली. तिचा शोध अद्याप लागलेला नाही. डोंगराळ भागात राहणाऱ्या कुडिया समुदायानं शरण्याच्या सुरक्षेसाठी तम्माचा देवीकडे प्रार्थना केली आहे. वन विभाग आणि पोलिसांकडून शरण्याचा शोध सुरु आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims