Dailyhunt
Gold Price Today 4 May: सोमवारी सकाळीच गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे भाव स्थिर

Gold Price Today 4 May: सोमवारी सकाळीच गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे भाव स्थिर

Gold Silver Prices: सोमवार, आठवड्याच्या पहिल्याच व्यापार दिवशी, सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा कधी उपर…कधी नीचे सुरूच राहिले आहे. 4 मे रोजी सकाळच्या सत्रात MCX (भारतीय फ्युचर्स बाजार) वर सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे.

अमेरिकन डॉलरच्या मूल्यात वाढ आणि क्रूडच्या किंमती दीर्घकाळापर्यंत उच्च पातळीवर राहायच्या भीतीमुळे महागाईत वाढ होण्याची कायम असलेली चिंता या घसरणीमागील कारणे होती.

सोने-चांदीचा आजचा दर काय

एमसीएक्सवर सोन्याचे जून फ्युचर्स 0.23 टक्क्यांनी घसरून 1,51,005 प्रति 10 ग्रॅम झाले तर, जुलै चांदीचा वायदा दर 0.15% कमी होऊन 2,50,549 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या जहाजांना वाट देण्यासाठी अमेरिका प्रयत्न करेल,' असे विधान केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती काहीशा नरमल्या असल्या, तरीही डॉलर इंडेक्समध्ये 0.06% किरकोळ वाढ दिसून आली. मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेत कोणताही स्पष्ट प्रगती दिसून न आल्यामुळे अद्यापही तेलाची किंमत 100 डॉलर्स प्रति बॅरलवर स्थिर आहे.


या दरम्यान,ट्रम्प यांनी शनिवारी तेहरानने सादर केलेल्या नवीन प्रस्तावाचा आढावा घेणार असल्याचे सांगितले. तेहरानने मध्यस्थ करणाऱ्या पाकिस्तानकडे 14 पानांचा नवीन प्रस्ताव सादर केला इराणच्या तस्निम आणि फर्स या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमध्ये सर्व आघाड्यांवरील संघर्ष संपुष्टात आणणे आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या जलमार्गासाठी एक नवीन framework लागू करणे, या प्रस्तावांचा समावेश आहे.

शेअर बाजारात आनंदीआनंद गडे

तसेच सोने-चांदीच्या बाजारात किरकोळ बदल झाला असताना देशांतर्गत शेअर बाजारात पाच राज्यांमधील निवडणूक निकालांचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. याशिवाय तेलाच्या किंमतीत घट आणि होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या जहाजांना ट्रम्प यांनी मदतीचे संकेत दिल्यामुळे सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात Nifty50 आणि BSE Sensex मध्ये जोरदार वाढ दिसून आली. Nifty50 ने 24,100 पातळी ओलांडली आणि BSE सेन्सेक्स 500 हून अधिक अंशांनी वधारला.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims