Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gold Silver Price Today: सराफा बाजारात गोल्ड शॉक! सोन्या, चांदीच्या घसरणीला ब्रेक; ट्रम्प यांच्या प्लानिंगने भारतात दरांत पुन्हा तेजी

Gold Silver Price Today: सराफा बाजारात गोल्ड शॉक! सोन्या, चांदीच्या घसरणीला ब्रेक; ट्रम्प यांच्या प्लानिंगने भारतात दरांत पुन्हा तेजी

Gold Price News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य-पूर्वेतील विस्तारित लष्करी गुंतवणुकीची शक्यता फेटाळून लावल्या आणि नुकत्याच ऊर्जेच्या किमती वाढल्याने महागाईच्या चिंता दूर केल्यामुळे 3 सप्टेंबर रोजी सोनं पुन्हा रंगात आलं.

सोने-चांदीचे दर आज किती वाढले

ऊर्जा-आधारित महागाईबाबत चिंता कमी झाल्याने आणि अमेरिकन डॉलरमधील घसरणीमुळे सराफा बाजारातील दरांना आधार मिळाला, परिणामी 3 सप्टेंबर रोजी सोन्या आणि चांदीचे भाव वधारले. गुरुवारी बाजाराच्या सुरुवातीला सकाळी 9.15 वाजता देशांतर्गत वायदा बाजारात MCX वर सोन्याचा वायदा 0.75 टक्के किंवा सुमारे 1100 रुपयांनी वाढून 1.53 लाखांवर उसळला तर, चांदीचा वायदा भाव 0.88% किंवा 2000 रुपये वाढीसह 2.38 लाखांच्या आसपास व्यवहार करत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची स्थिती काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील अलीकडच्या हल्ल्यानंतर मध्य-पूर्वेत दीर्घकाळलष्करी कारवाईची शक्यता नाकारली, ज्यामुळे ऊर्जा किमतींमधील दरवाढीमुळे निर्माण झालेली महागाईची चिंता कमी झाली आणि सोन्याच्या दरात वाढ कायम राहिली.

आदल्या दिवशी 1% उसळी आणि 3 दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावून सोन्याचा दर सुमारे $4,385 औंसवर झाला. इराणवरील हल्ले अल्पकाळ राहतील, असे ट्रम्प यांनी म्हटल्यानंतर तेलामधील तेजीचा वेग मंदावला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे अनिश्चित काळासाठी चालणाऱ्या युद्धाची भीती पुन्हा निर्माण झालेली, परिणामी महागाई वाढण्याची चिंता वाटू लागलेली आणि हीच बाब कमी परतावा देणाऱ्या सोन्यासाठी अडथळा ठरत होती.

बुधवारी जपानी येनच्या मूल्यातील मोठ्या वाढीनंतर अमेरिकी डॉलर किंचित घसरला, ज्यामुळे जपानी चलनास पाठिंबा देण्यास अधिकारी आणखी काही कारवाई करतील का, याबाबत संकेतासाठी व्यापारी सतर्क झाले. अशाप्रकारे, डॉलरच्या घसरणीमुळे परकीय चलन बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोन्याचे आकर्षण वाढू शकते.

सोने-चांदीचे दर वाढण्याची कारणे

न्यूयॉर्क फेड बँकेचे अध्यक्ष जॉन विल्यम्स यांनी म्हणतात की, टॅरिफचा प्रभाव कमी झाल्यामुळे महागाई कमी होईल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उंच आलेख कायम ठेवला तरी, त्याचा सर्व सेवांवर परिणाम फारसा जाणवत नसून विल्यम्स यांच्या या वक्तव्यानंतर कमोडिटी बाजारात तेजी आली, तर याआधी फेडचे अध्यक्ष केविन वॉर्श यांच्या व्याज दरांवरील ठाम भूमिकेमुळे सोने आणि चांदीच्या किमती घसरणपंथीला आलेल्या.

सोने-चांदीच्या भावावर बाजार तज्ज्ञांचे मत काय

दुसरीकडे, HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) सौमिल गांधी म्हणाले की, बुधवारी सोन्याने 3 आठवड्यांहून जास्त नीचांकी गाठलेली. बेशकिंमती धातूंवर विक्रीचा मोठा दबाव दिसून आला, पण अनेक बाजार तज्ज्ञांनी 2026 च्या अखेरपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढीचा अंदाज वर्तवला आहे.

(Disclaimer : हा लेख केवळ माहितीसाठी आहे, याला गुंतवणुकीचा सल्ला मानू नये. तसेच वर नमूद किमतींमध्ये जीएसटी आणि घडणावळ शुल्काचा समावेश नसल्यामुळे खरेदी करण्यापूर्वी तुमच्या स्थानिक सराफा बाजारातील नवीन दर तपासून घ्या.)
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims