Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gold Silver Prices Fall: सोने आणि चांदीत तेजी-मंदीचा खेळ; ग्राहकांच्या चिंतेला मिळेना उतार, ग्राहक झाले हैराण! आजचा भाव किती?

Gold Silver Prices Fall: सोने आणि चांदीत तेजी-मंदीचा खेळ; ग्राहकांच्या चिंतेला मिळेना उतार, ग्राहक झाले हैराण! आजचा भाव किती?

Gold Price Today in India: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. मागील दोन सत्रांमध्ये 3.5 टक्क्यांहून अधिक घसरल्यानंतर मंगळवार, 1 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली.

मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाचा आणि अमेरिकेच्या कठोर चलनविषयक धोरणाच्या अपेक्षांमध्ये गुंतवणूकदारांनी समतोल साधला.

सोने-चांदीचा आजचा दर काय

सप्टेंबरमध्ये फेडकडून व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेबाबत बाजार आपल्या अपेक्षांचे पुनर्मूल्यांकन करत असताना बाजारातील सहभागींचे आता लक्ष बुधवारी जाहीर होणाऱ्या ADP नॉन-फार्म एम्प्लॉयमेंट चेंज आकडेवारी आणि त्यानंतर शुक्रवारी येणाऱ्या नॉन-फार्म पेरोल्स व बेरोजगारीच्या आकडेवारीकडे असेल.

या दरम्यान, 1 सप्टेंबर रोजी MCX वरील सोन्याचा वायदा 0.14% किंचित वाढून 1.54 लाखांवर स्थिर राहिला आहे, तर चांदीचा वायदा भाव 0.55 टक्क्यांनी वाढून 2.41 लाखांवर व्यवहार करत आहे. तसेच 1 सप्टेंबर रोजी सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान, COMEX गोल्ड फ्युचर्स 0.19% वाढीसह 4,490.10 डॉलर्स प्रति औंसवर व्यवहार करत होते, तर चांदीचे भाव 0.23 टक्क्यांनी वाढून 66.37 डॉलर्स प्रति औंस झाले.

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा बिनसलं

अमेरिकी सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणच्या रॉकेट लाँचरवर हल्ला केला, त्यानंतर इराणने UAE आणि जॉर्डनमधील लक्ष्यांवर हल्ले केले, ज्यामुळे जागतिक एनर्जी पुरवठ्यात संभाव्य व्यत्ययाची चिंता वाढली. 3 आठवड्यांतील सर्वात मोठी वाढ नोंदवल्यानंतर तेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ झाली, ज्यामुळे महागाईची चिंता वाढली आणि फेडरल रिझर्व्हने व्याजदर अधिक काळ वाढवून ठेवावेत या भूमिकेला बळकटी मिळाली.

यावर्षी सोने 28000 रुपयांनी महागले

यावर्षी सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असून साल 2026 मध्ये आतापर्यंत सोन्याचा दर 28000 रुपयांनी महाग झाला आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी भारतातील सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.33 लाख रुपये होता, जो आता 1.61 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तसेच 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा भाव 2.30 लाख रुपये प्रति किलो होता, जो आता 2.47 लाखांवर उसळला आहे. याच काळात 29 जानेवारी रोजी सोन्याने 1.76 लाख रुपये आणि चांदीने 3.86 लाख रुपयांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims