Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gold Silver Rate: सोन्याचे चांदीचे दर घसरायला सुरुवात, गुंतवणूक करणे फायद्याचे की तोट्याचे? 2 सप्टेंबरला किती बदलले दर?

Gold Silver Rate: सोन्याचे चांदीचे दर घसरायला सुरुवात, गुंतवणूक करणे फायद्याचे की तोट्याचे? 2 सप्टेंबरला किती बदलले दर?

Gold Silver Price Today: सोने आणि चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड अस्थिरता पसरली आहे. पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अजूनही मावळला नसून सातासमुद्रापारहून फेडरल रिझर्व्हने वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले, ज्यामुळे उकळत्या सोन्या-चांदीच्या दरांना उतरती कळा लागली.

त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा सोन्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर किमतीत लक्षणीय घसरण झाली.

सोन्यासोबत चांदीच्या किमतीतही घट झाली असून देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही बाजारांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. देशांतर्गत सराफा बाजारात बुधवार, 2 सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत घट नोंदवली गेली असताना MCX वरही किंमतीचे वर-खाली सुरू आहे.

आज किती स्वस्त झालं सोनं?

सणासुदीनिमित्त तुम्ही मौल्यवान दागिने खरेदीचा विचार करत असाल तर, आज सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली असून चांदीचा भाव वाढला आहे. सोन्याचा भाव 1,52,160 रुपये 10 ग्रॅमवर कमी झाला तर चांदी 2,34,780 रुपये किलोवर घसरली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांत सोन्याची किंमत सुमारे 4.5% कमी झाली, पण गेल्या वर्षभरात सोने अजूनही 43.3% मजबूत झाले.

त्याचवेळी, देशांतर्गत बाजारातील वायदा मार्केट MCX वर सोन्याचा वायदा दर 1.23% किंवा तब्बल 1800 रुपयांनी स्वस्त होऊन 1.49 लाखांवर व्यवहार करत आहे. तसेच चांदीच्या फ्युचर्स किंमती 1.41 टक्के म्हणजे सुमारे 3400 रुपयांनी कमी होऊन 2.32 लाखांवर खाली आल्या आहेत. दुसरीकडे सरकार मे महिन्यात आयात शुल्क वाढवल्यावर आता कर दर कमी करण्याचा विचार करत असून यामुळे सणासुदीत काहीशी आणखी स्वस्ताई येण्याची शक्यता आहे.

गेल्या सलग तीन सत्रांतील तीव्र घसरणीनंतर सोन्याच्या किमती काहीशा नरमल्या आहेत. जागतिक बाजार आता अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या भूमिकेचे मूल्यांकन करत असून सुरक्षित गुंतवणुकीची मागणी आणि डॉलरची हालचाल सोन्याला काही प्रमाणात आधार देत आहेत. दुसरीकडे, सोन्यापाठोपाठ अलीकडील तेजीनंतर चांदीच्या किमतींवरही दबाव दिसत आहे.

भारतीय बाजारात सोन्यावर दबावाचे कारण काय?

गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींनी अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर भारतातील प्रत्यक्ष सोन्याच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. मे 2026 नंतर आणि आयात शुल्कात वाढ झाल्यावर पिवळसर धातूची मागणी मंदच राहिली.

जगातील सोन्याच्या सर्वात मोठ्या उपभोक्त्यांपैकी, भारत, दरवर्षी अंदाजे 700 ते 900 टन सोन्याची आयात करतो. त्यामुळे सणासुदीतील मागणीत बदल होणे लक्षणीय हालचाल आहे, पण सोन्याच्या भारताच्या सांस्कृतिक महत्त्वामुळे लग्नसराईत खरेदी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे.

(Disclaimer : वरील लेख केवळ माहितीसाठी आहे. बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते त्यामुळे, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या.)
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims