Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
GT vs RCB Final : 'आम्ही जिंकलो पण मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर खरा गेम फिरला'; पलटण कशी ठरली गेमचेंजर? विराट कोहलीकडून मोठा खुलासा

GT vs RCB Final : 'आम्ही जिंकलो पण मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर खरा गेम फिरला'; पलटण कशी ठरली गेमचेंजर? विराट कोहलीकडून मोठा खुलासा

मुंबई : आयपीएल फायनल सामन्यामध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर आरसीबी संघाने गुजरात टायटन्सवर पाच विकेटने मात केली. फायनल सामना जिंकत आरसीबीने सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना १५५-८ धावा केल्या होत्या.

या लहान लक्ष्याचा पाठलाग करताना सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची खेळी करत सामना जिंकवला. एकीकडे विकेट जात असताना विराटने एक बाजू लावून धरली होती. गुजरातने आपली सर्व ताकद लावली पण त्यांना विजय मिळवण्यापासून कोहलीने रोखले. विराटने आपल्या१८ नंबरच्या जर्सीप्रमाणे १८ व्या ओव्हरमध्येच विनिंग शॉट मारताना षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केले. सामना संपल्यावर बोलताना विराटने मुंबई इंडियन्सच्या संघाचा उल्लेख केला. नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.

मी आमच्या संघातील खेळाडूंना आधीच बोललो होतो की मला मागील वर्षीसारखा दबाव यावेळी जाणवत नाहीये. आम्हाला या वर्षी आमच्या टीममधील खेळाडूंच्या टॅलेंटबाबत स्पष्टपणे अंदाज होता. पॉइंट टेबलमध्ये आम्ही पहिली जागी मिळवली याच्यामागे काही काहीतरी विशेष कारण असेलच. आम्ही एकच गोष्ट करण्याचं ठरवलं होतं ती म्हणजे स्वाभाविक खेळ करायचा आणि जर आमच्या रणनीती अचूकपणे अंमलात आणल्या तर आम्ही यंदाचा सर्वोत्तम संघ आहोत. साखळी सामन्यांमध्ये केलेल्या प्रदर्शनामागे हे सुद्धा एक कारण आहे. आमच्या खेळाडूंमधील विनम्रता आणि शांत स्वभाव ही कौशल्य आज दिसलीत आणि आम्ही अचूक प्रदर्शन केल्याचं विराट कोहली याने म्हटलं.

आम्हाला साखळी सामन्यांदरम्यान एक ब्रेक मिळाला होता त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. एक सामना हरलो आणि मुंबईविरूद्ध रोमांचक झालेल्या सामन्यात निसटता विजय मिळवलेला. तो आठवडा आमच्यासाठी थोडा कठिण होता. पण मुंबईविरूद्धचा विजय मिळवल्यानंतर आमचा आत्मविश्वास नव्याने जागृत झाला. मग पुढील सामन्यात केकेआरवर मोठा विजय मिळवत पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान पटकावल्याचं विराट कोहलीने आवर्जून सांगितलं.

आमच्या टीममध्ये असे खेळाडू आहेत की ज्यामुळे कोणत्याही सामन्यामध्ये खेळायला उतरल्यावर कोणा एकावरच सामना जिंकवण्याचा दबाव येत नाही. कारण इतर खेळाडू असे आहेत की तेसु्द्धा त्यांच्या खेळाच्या जोरावर संघाला विजयी मार्गापर्यंत पोहोचवू शकतात. हेजलवूड, भुवी, डफी यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोलंदाज त्यासोबतच कृणाल पंड्या ज्याच्यावर पूर्पपणे अवलंबून राहू शकता. त्यामुळे आमचा संघ प्रचंड ताकदीचा आणि एक अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे आत्मविश्वास असल्याचं विराट म्हणाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims