Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
GT vs RR Qualifier 2 : गुजरात टायटन्सची फायनलमध्ये धडक, प्रिन्सचे दमदार शतक; एक चूक ज्यामुळे राजस्थानने गमावला सामना

GT vs RR Qualifier 2 : गुजरात टायटन्सची फायनलमध्ये धडक, प्रिन्सचे दमदार शतक; एक चूक ज्यामुळे राजस्थानने गमावला सामना

मुंबई : आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ७ विकेटने पराभव केला आहे. या विजयासह गुजरातने फायनलमध्ये धडक मारली असून आरीसीबीसोबत त्यांची लढत होणार आहे.

शुभमन गिलचे पाचवे शतक १०४ धावा आणि साई सुदर्शनच्या ५८ धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने सहज हा सामना खिशात घातला. राजस्थान संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१४-६ धावा केल्या होत्या. गुजरातकडून बटलर आणि तेवतिया यांनी नाबाद राहत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गुजरातने त्यांच्या इतिहासामधील सर्वाधिक लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करत तिसऱ्यांदा फायनल गाठली आहे. आता गुजरातच्या घरच्या मैदानावर फायनल सामना असल्याने आरसीबीसाठी कडवे आव्हान असणार आहे.

या सामन्यामध्ये राजस्थानने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण गुजरातच्या गोलंदाजांनी पहिल्या दोन ओव्हरध्ये यशस्वी जयस्वाल १ धावा आणि ध्रुव जुरेल ७ धावांवर आऊट करत मोठे झटके दिले. त्यानंतर १५ वर्षाच्या वैभव याने जडेजासोबत ६५ चेंडूत १२७ धावांची भागीदारी करत कमबॅक करून दिले. जडेजा रिटायर हर्ट झाला त्यानंतर पुन्हा एकदा राजस्थानचा जाव गडगडला. रियान पराग ११ धावा, शानका ३ धावांवर आऊट झाला. वैभवने एकट्याने ९६ धावांची खेळी करत संघाला जिवंत ठेवल, त्याचे चार धावांनी शतक हुकले. शेवटला फरेराने ३८ धावा करत संघाला २१० चा आकडा पार करून दिला होता.

गुजरातकडून आज सलामीला आलेल्या साई सुदर्शन ५८ धावा आणि शुभमन गिलच्या १०४ धावांनी गुजरातचा विजय निश्चिते केला होता. यामध्ये राजस्थान संघाकडून एक चूक झाली, फरेराकडून साईचा १४ धावांवर कॅच सोडला तो महागात पडले. कारण दोघांनी १६७ धावांची भागीदारी केली. साई पुन्हा एकदा हिट विकेट ठरला. त्यानंतर शुभमन गिलही आऊट झाला पण शेवटला राहुल तेवतिया आणि बटलर यांनी विजय मिळवून दिला.

दरम्यान, या सामन्यामध्ये फरेरा याने बॅटिंग करताना ३८ धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे राजस्थानने दिलेल्या लक्ष्याला आणखी ताकद आली होती. परंतु याच खेळाडूने गुजरात बॅटिंग करत असताना त्याने साई सुदर्शन याचा १४ धावांवर कॅच सोडला होता. हा कॅच सोडणं राजस्थानला चांगलं महागात पडलं. कारण दोघांनीही विकेट सोडली नाही आणि राजस्थानच्या हातातून सामना निसटला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims