Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IND vs AUS U-19 Series : बापाचा वारसा चालवणार पोरं! ज्युनियर 'सेहवाग-द्रविड' टीम इंडियात दाखल; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर, पाहा वेळापत्रक

IND vs AUS U-19 Series : बापाचा वारसा चालवणार पोरं! ज्युनियर 'सेहवाग-द्रविड' टीम इंडियात दाखल; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर, पाहा वेळापत्रक

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या नव्या पिढीने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाच्या भारत दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय अंडर-१९ संघाची अधिकृत घोषणा केली आहे.

या संघ निवडीत सर्वात मोठी आणि लक्षवेधी बाब म्हणजे, भारताचे माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या मुलांची संघात झालेली दणदणीत एंट्री झाली आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वनडे आणि २ मल्टी-डे (कसोटी) सामने खेळवले जाणार आहेत.

आर्यवीर सेहवागचा वनडे संघात जलवा

टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. सध्या तो सुरू असलेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आपला खेळ दाखवत आहे. १९ ऑक्टोबर २००७ रोजी जन्मलेला १८ वर्षीय आर्यवीर आपल्या वडिलांप्रमाणेच टॉप-ऑर्डरचा अत्यंत आक्रमक फलंदाज आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो आपल्या बॅटची ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

अन्वय द्रविडवर पुन्हा दाखवला विश्वास

या संघात भारताचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा लेक अन्वय द्रविड यालाही संधी मिळाली आहे. अन्वय हा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. जुलै महिन्यात झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही त्याने अंडर-१९ वनडे संघातून दोन सामने खेळले होते. त्या मालिकेत त्याने ११७ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने ८७ आणि १४ धावांची खेळी केली होती. त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे.

नेतृत्वाची धुरा कुणाकडे?

या अत्यंत महत्त्वाच्या घरच्या मालिकेसाठी वनडे संघाचे कर्णधारपद लक्ष्य रायचंदानी याच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. तर, मल्टी-डे (कसोटी) मालिकेसाठी संघाचे नेतृत्व यशवर्धन चौहान करणार आहे.

भारत अंडर-१९ वनडे संघ

लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल, आर्यवीर सहवाग, व्हीके विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनल चौहान, अन्वय द्रविड (यष्टिरक्षक), व्ही यशवीर, रोहित यादव, शविन विनोद, मोहित उल्वा, चिगुरुपती व्यंकट आणि काव्या पटेल.

असे आहे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

तारीखसामनावेळठिकाण
१८ सप्टेंबर २०२६पहिला वनडे सामनासकाळी ९:०० वाजताराजकोट
२१ सप्टेंबर २०२६दुसऱा वनडे सामनासकाळी ९:०० वाजताराजकोट
२३ सप्टेंबर २०२६तिसरा वनडे सामनासकाळी ९:०० वाजताराजकोट
२७-३० सप्टेंबर २०२६पहिला मल्टी-डे (कसोटी) सामनासकाळी ९:३० वाजताराजकोट
५-८ ऑक्टोबर २०२६दुसरा मल्टी-डे (कसोटी) सामनासकाळी ९:३० वाजताअहमदाबाद
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims