मुंबई : वर्ल्ड कप २०२६नंतर भारतीय संघाला एकही विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडनंतर आता इंग्लंडची मालिका गमवावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यामध्ये भारतीय संघ ७६ धावांवर ऑल आऊट झाला.वर्ल्ड कप विजेत्या संघाची झालेली अवस्था पाहून चाहत्यांनी कोच गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरवरच्या नेतृत्त्वावर टीका करायला सुरूवात केली आहे.
फॉर्ममध्ये नसल्याने सू्र्यकुमार यादव याला फक्त कर्णधारपदावरूनच हटवले नाहीतर तर त्याला संघातही जागा दिली नाही. मात्र आता एक विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ तरसताना दिसत आहे. भारताने सूर्याच्या नेतृत्त्वात गेल्या अडीच एकही टी-२० मालिका गमावली नव्हती. मात्र आता आयर्लंड दौऱ्यावर व्हाईटवॉशनंतरही भारताने सलग दोन सामने गमावले आहेत. तिसरा सामना गमावल्यावर कोच गंभीरने नवीन संघ तयार करताना असे निकाला पाहायला मिळू शकतात असे म्हटले आहे. त्यासोबतच तिसऱ्या सामन्यात पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळणाऱ्या खेळाडूचे कौतुक करताना त्याचे भविष्य असल्याचं त्याने म्हटलं आहे.
गौतम गंभीर काय म्हणाला?
आम्ही चांगले प्रदर्शन नाही केले, वर्ल्ड कपची फायनल खेळलेला संघ पूर्णपण वेगळा होता आणि आताच्या संघात अनेक बदल आहेत. त्यामुळे नवीन संघ तयार करण्यासाठी थोडा वेळ लागणारच,१५ वर्षांच्या वैभवने करियरला सुरूवात केली, हर्षित राणा दुखापतीनंतर कमबॅक करत आहे. आपल निकाल काय लागतो हेच पाहतो यात काही शंका नाही पण पण आपल्याला व्यावहारिकही असायला हवं, असं गौतम गंभीर म्हणाला.जेव्हा संघात स्टार खेळाडू तयार करत असता त्यावेळी असे निकाल पाहायला मिळू शकतात. कारण खेळाडूंनाही त्यांचा खेळ बहरून देण्यासाठी वेळ द्यावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे स्टार खेळाडू करण्यासाठी वेळ हा लागतोच. मला माहिती नाही की इंग्लंड बाकी सामन्यांमध्ये काय करणार आहे पण आम्हाला वेगवान गोलंदाजांविरोधात चांगली कामगिरी करायला हवी. प्रिन्स यादव याचा दुसराच सामना होता त्याने ३० धावा देत विकेट घेतल्या. फक्त आकडे पाहणं सोपं आहे पण त्याने डेथ ओव्हर, पॉवर प्ले आणि अवघडवेळी बॉलिंग केली. दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याने केलेली बॉलिंग पाहून हे दिसून येतं की त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मला आशा आहे की तो मेहनत घेईल आणि आणखीन चांगले प्रदर्शन करेल, असं म्हणत गंभीरने प्रिन्स यादवचे कौतुक केले.
दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावासामुळे रद्द झाला होता. पण त्यानंतर भारताने सलग दोन सामने गमावले आहे. इंग्लंडने २-० ने आघाडी घेतलीय. संजूला सॅमसनला खाली बसवले परंतु त्याचा काही निकालावर परिणाम दिसला नाही. आता चौथ्या सामन्यात कोणते बदल पाहायला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

