मुंबई : भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर असून टी-२० आणि वन डे मालिका होणार आहे. ५ टी-२० सामने आणि ३ वनडे सामने झाल्यावर भारताचा श्रीलंका दौरा असणार असून त्यासाठीचे बीसीसीआयने पुढील श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
श्रीलंका दौऱ्यामध्ये भारतीय संघाचे दोन कसोटी सामने असणार आहेत. दोन कसोटी सामने नेमके केव्हा असणार जाणून घ्या.
श्रीलंका दौऱ्याची घोषणा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताला आपले आव्हान ठेवण्यासाठी श्रीलंकेमध्ये होणारी दोन सामन्यांची मालिका महत्त्वाची असणार आहे. आता मागे घरच्या मैदानावर भारताला दक्षिण आफ्रिका संघाने पराभूत केले होते. भारताने या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ९ सामन्यांमध्ये ४ सामने जिंकले होते. कसोटी पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ टॉप तीनमध्ये आहेत. त्यामुळे कमबॅक करण्यासाठी भारताला ही मालिका जिंकावी लागणार आहे. आता भारतीय संघाने अफगाणिस्तानसोबत एक कसोटी सामना खेळला होता. त्यामध्ये भारताने सहज विजय साकारला होता पण त्या विजयाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्य ग्राह्य धरता येणार नव्हते. या एकमेक कसोटीमध्ये अफगाणिस्तानविरूद्ध अनेक युवा खेळाडूंनी पदार्पण केले होते. यामधील मानव सुथार हा सात विकेट घेत सामनावीर ठरला होता.
भारत वि. श्रीलंका कसोटी सामने वेळापत्रक
- पहिला कसोटी सामना- १५ ऑगस्ट २०२६ ते १९ ऑगस्ट २०२६ (गॉल)
- दुसरा कसोटी सामना- २३ ऑगस्ट- २०२६ ते २७ ऑगस्ट २०२६ (कोलंबो)
भारत-श्रीलंका हेड टू हेड (श्रीलंका)

