Dailyhunt
Indigo Flights: अमेरिकेत विमान जमिनीवर फिरवायला मिळतात 95 लाख रुपये! इंडिगोचीही अशीच 'ट्रिक'; नव्या विमानसेवेमुळे भारतीयांना मोठा फायदा

Indigo Flights: अमेरिकेत विमान जमिनीवर फिरवायला मिळतात 95 लाख रुपये! इंडिगोचीही अशीच 'ट्रिक'; नव्या विमानसेवेमुळे भारतीयांना मोठा फायदा

चेन्नई: सध्या जगभरातील अनेक विमान कंपन्या नागरिकांच्या हवाई प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. नुक्तेच अमेरिकेच्या शिकागो विमानतळावर एक अजब प्रकार सुरू केला आहे.

येथे वैमानिकांना विमान हवेत उडवण्यासाठी नव्हे तर विमान केवळ जमिनीवर चालवण्यासाठी वर्षाला तब्बल 95 लाख रुपये ($100,000) दिले जात आहेत. यामागील हेतू फक्त एकच, प्रवास अधिक आरामदायी करणे. दरम्यान, इंडीगोने भारातातील चेन्नईहून हिंद महासागरासाठी सुरू केले थेट रियुनियन बेटावरील (Reunion Island) हवाई सेवेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण या हिंदी महासागरातील एका फ्रेंच बेटावरील विमान सेवेमुळे भारतीयांचं नशीब पालटणार आहे.

रियुनियन बेट नेमका कुठे आहे?

रियुनियिन बेट हिंदी महासागरातील एक छोटासा बेट आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मॉरिशस आणि मादागास्कर बेटांच्या अगदी जवळ म्हणजे साधाराणपणे 689 किमी अंतरावर स्थित हा बेट आहे. भौगोलिकदृष्ट्या हा बेट आफ्रिकेजवळ असला तरी फ्रान्सचा हा अधिकृत भाग आहे. त्यामुळे या बेटावर फ्रान्सचे कायदे लागू होत असून युरो हे चलन चालते. पण आश्चर्याची बाब ही की या लहानशा बेटावर भारतीय वंशाचे (विशेषतः तामिळ) नागरिक राहतात. भारतातून यापूर्वी या बेटावर जाण्यासाठी कोणतीही थेट विमान सेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रवाशांना दुबई किंवा मॉरिशसमार्गे बेटावर जावं लागत होतं. हा प्रवास अत्यंत खर्चिक असून त्यात 15 ते 20 तासांचा त्रास सहन करावा लागत असे. आता या थेट विमानसेवेमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

'ब्रिटीश एअरवेज'ची नवी सेवा काय आहे?

अमेरिकेत विमान जमिनीवर फिरवण्यासाठी शिकागोच्या ओ'हेअर विमानतळावर (Chicago O'Hare Airport) वैमानिकांना भरगच्च पगार दिला जात आहे. या विमानतळावर प्रवाशांना एक वेगळीच समस्या भेडसावते. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, लंडनहून येणारी विमानं 'टर्मिनल 5' वरच उतरू शकतात. मात्र, लंडनहून 'ब्रिटीश एअरवेज'चे अनेक प्रवासी पुढे 'अमेरिकन एअरलाईन्स'ने देशांतर्गत प्रवास करतात. अशावेळी प्रवाशांना स्वतः टर्मिनल 5 वरून टर्मिनल 3वर जावं लागतं. यावेळी टर्मिनलवर पोहोचण्यास विलंब झाला तर प्रवाशांची कनेकटींग फ्लाईट चुकण्याची दाट शक्यता असते. अशावेळी प्रवाशांची धावपळ न व्हावी यासाठी ही नवीन योजना आखण्यात आली आहे.


आता विमान टर्मिनल 5 वरती उतरल्यावर जमिनीवरून चालवतच टर्मिनल 3वर घेऊन जाण्यात येईल. परंतु, हे काम दिसतं तेवढं सोपं नाही आहे. विमानतळावरील गजबजलेल्या धावपट्ट्यांवरून विमान सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी प्रशिक्षित पायलटची गरज आहे. त्या हवेत विमान उडवणाऱ्या पायलटचा वेळही वाया जाऊ शकतो. यासाठी त्यांनी जमिनीवर विमान चालवण्यासाठी Taxi Pilotsची निवड केली.

या नवीन विमान सेवेमुळे भारतियांना होणारे 5 प्रमुख फायदे कोणते?

1. वेळेची बचत

थेट चेन्नईहून सुरु झालेल्या विमानसेवेमुळे प्रवासी आता अवघ्या 5-6 तासांत रियुनियन बेटावर पोहोचू शकतात. पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा यामुळे वेळ वाचत असून केनक्टिंग फ्लाइट्सच्या मागे 15 ते 20 तास वेळ वाया घालवावा लागणार नाही.

2. आता आंतरराष्ट्रीय प्रवास खिशाला परवडणार

दुबई किंवा मॉरिशसवरून प्रवास करताना भारतियांच्या खिशाला नेहमी कात्री लागायची. त्यात वेगवेगळ्या कंपन्यांचं तिकिट काढण्यासाठी खूप पैसे खर्च करून मेहनतही करावी लागायची. आता इंडिगोच्या फक्त एका तिकिटावर हा प्रवास शक्य होणार आहे. परवडणाऱ्या दरात भारतीयांना युरेपच्या संस्कृतीचा अनुभव घ्यायला भेटणार आहे.

3. प्रवासी हाच खरा राजा

ब्रिटिश एअरवेजप्रमाणेच आता भारतीय विमान कंपन्याही प्रवाशांना सर्वोच्च प्राधान्य देऊन विमान प्रवास सोपा करण्यावर भर देत आहेत. विनाकारण दुसऱ्या देशातील विमानतळांवर न थांबता प्रवाशांना थेट इच्छुक स्थळी पोहोचता येणार आहे.

4. भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी सुवर्णसंधी

रियुनियन बेटावर सध्या भारतीय वंशाचे 3 लाख नागरिक राहतात. त्यांची नाळ भारातातील तामिळनाडू आणि पुद्दुचेरीशी जोडलेली आहे. चेन्नईवरून अशा प्रवाशांना आपल्या मूळ गावी भेट देता येणार असून येथील नागरिकांनाही थेट प्रवास करता येणार आहे. याला VFR Traffic - व्हिजिटिंग फ्रेंड्स अँड रिलेटीव्ह्ज ट्रॅफिक असं ही म्हटलं गेलं आहे.

5. इको-ट्यूरिझमचा आनंद

सध्या तरूण पर्यटकांमध्ये थायलंड आणि दुबईसारख्या देशांपैक्षा नवीन आणि वेगळं काहीतरी पाहण्याची 'क्रेझ ' वाढली आहे. रियुनियन बेटावर घनदाट जंगले, सुंदर समुद्र किनारे जे UNESCOखाली जागतिक वरसा स्थळ देखील आहे, असे पर्यटन ठिकाणं आहेत. त्यामुळे भारतीय पर्यटकांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims