मुंबई : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये शनिवारी भारतावर इंग्लंडने ४ विकेटने विजय मिळवला आहे. मँचेस्टमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पहिल्यांदा बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये १९०-७ धावा केल्या होत्या.
भारताकडून अभिषेक शर्माने ४३ धावा आणि ईशान किशनने ४९ धावा केल्या होत्या. मात्र पाठलाग करताना इंग्लंड संघाचा डाव गडगडला होता, परंतु एकट्या जेकब बेथल याने नाबाद ७६ धावा करत सामना इंग्लंडला जिंकवून दिला. खरं पाहायला गेलं तर हा सामना भारताच्या हातामध्ये होता, मात्र एक १७ ओव्हर भारतासाठी गेमचेंजर ठरली. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रतिक्रिया देताना कोणाला कोणाला व्हिलन ठरवलं जाणून घ्या.
श्रेयस अय्यर काय म्हणाला?
श्रेयस अय्यरने या पराभवासाठी जेकब बेथल, सॅम करन आणि आपल्या रवी बिश्नोईला पराभवासाठी जबाबदार ठरवलं आहे. श्रेयस अय्यरने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून तो एकदाही विजयी झालेला नाही. जेकब याने नाबाद ७६ धावा, करनने तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. भारताने आयर्लंडविरूद्धचे दोन सामने गमावले होते, त्यानंतर इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंड संघाने हा विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
वैभव सूर्यवंशीचे पदार्पण

