AI Edge Eloquent App: आता डिक्टेशनसाठी (बोलून टाईप करण्यासाठी) डेटाची गरज नाही? हो, हे खरं आहे. एका रिपोर्टनुसार, गूगलने ॲपलच्या ॲप स्टोअरवर 'AI Edge Eloquent' हे नवीन गुपित ॲप लाँच करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
इंटरनेटशिवाय आणि वेगवान पद्धतीने आवाजाचं मजकुरात रूपांतर करणारं हे टूल सध्या टेक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. गूगलची ही नवी चाल नेमकी कोणासाठी आहे आणि ती कशी काम करते? चला जाणून घेऊया.
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, गुगलने कोणत्याही गाजावाजाशिवाय Google AI Edge Eloquent नावाचे एक नवीन ॲप लाँच केले आहे. हे AI आधारित एक प्रगत 'डिक्टेशन टूल' असून, ते पूर्णपणे ऑफलाइन काम करते. कंपनीच्या Edge-based AI कॅम्पेनिंगला हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
TechCrunch च्या रिपोर्टनुसार, हे ॲप सर्वप्रथम ॲपलच्या ॲप स्टोअरवर दिसले. उत्पादकता साधनांच्या (Productivity Tools) वाढत्या बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी गुगलने ही रणनीती आखली आहे. या नवीन ॲपच्या माध्यमातून गुगल आता विस्पर फ्लो (Whisper Flow), सुपरव्हिस्पर (Superwhisper) आणि विलो (Willow) यांसारख्या प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना तगडी झुंज देणार आहे.
आता मॅन्युअल एडिटिंग आणि चुकीच्या 'स्पीच-टू-टेक्स्ट' ट्रान्सक्रिप्शनला निरोप द्या. Google AI Edge Eloquent हे एक प्रगत डिक्टेशन ॲप आहे, जे तुमचे नैसर्गिक बोलणे आणि व्यावसायिक दर्जाचा मजकूर यांमधील अंतर भरून काढण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
साध्या डिक्टेशन सॉफ्टवेअरमध्ये अनेकदा अडथळे येतात किंवा ते शब्दशः भाषांतर करतात, मात्र 'एलोक्वंट' तुमच्या बोलण्यामागचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी AI चा वापर करते. हे ॲप बोलताना येणारे अनावश्यक शब्द (उदा. 'उम्स', 'अह') आणि वाक्याच्या मध्यभागी केलेल्या चुका आपोआप सुधारते, ज्यामुळे तुम्हाला एक स्वच्छ आणि अचूक मजकूर मिळतो.
गुगलच्या 'Gemma' आर्किटेक्चरवर आधारित हे ॲप, सर्व्हर कनेक्शनशिवाय जलद 'स्पीच-टू-टेक्स्ट' सेवा देण्यासाठी अत्यंत कार्यक्षम, ऑन-डिवाईस एआय मॉडेल्सचा वापर करते.
क्लाउड कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असलेल्या इतर डिक्टेशन ॲप्सच्या तुलनेत, Eloquent पूर्णपणे 'ऑन-डिव्हाइस' चालण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे केवळ वेगवान प्रतिसादच मिळत नाही, तर वापरकर्त्याच्या गोपनीयतेची देखील खात्री मिळते.
हे ॲप आवाजावर प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर कार्य करत असल्याने, त्याला सतत इंटरनेटची गरज भासत नाही. परिणामी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असलेल्या भागातही हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरते.
Google AI Edge Eloquent ॲपचे फीचर्स कोणतेय़
- इंटेलिजेंट टेक्स्ट पॉलिशिंग: हे ॲप तुमच्या बोलण्यातील अडथळे, चुकीचे उच्चार किंवा विस्कळीत वाक्ये आपोआप सुधारते. केवळ शब्दच नाही, तर तुमच्या बोलण्याचा संदर्भ ओळखून हे ॲप निर्दोष मजकूर तयार करते.
- वैयक्तिक शब्दकोश: हे ॲप तुमच्या खास शब्दसंग्रहातून शिकते आणि एक Editable शब्दकोश तयार करते, ज्यामुळे तुमची डिक्टेशनची अचूकता वाढत जाते.
- सर्वोच्च गोपनीयता: मशीन लर्निंगची सर्व प्रक्रिया पूर्णपणे तुमच्या Android किंवा iOS डिव्हाइसवर स्थानिक पातळीवर चालते. तुमचा ऑडिओ आणि वैयक्तिक डेटा डिव्हाइसबाहेर जात नाही.
- वेगवान कार्यक्षमता: 'Google AI Edge' रनटाइममुळे डिक्टेशन अतिशय वेगवान होते. यासाठी तुम्हाला महागड्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची गरज नाही; सामान्य स्मार्टफोनवरही हे ॲप उत्कृष्ट चालते.
- मोफत सेवा: 'एलोक्वंट' ॲप कोणत्याही वापर मर्यादेशिवार (Usage Limit) पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
- 'फ्लोटिंग बटण' वापरू शकता: तुम्ही हे ॲप 'डिफॉल्ट कीबोर्ड' म्हणून सेट करू शकता किंवा कोणत्याही टेक्स्ट फील्डमध्ये जलद वापरासाठी 'फ्लोटिंग बटण' वापरू शकता.

