Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IPL 2026 Memes: SRH चा खेळ खल्लास! राजस्थाननं घेतला CSK चा बदला, RR च्या विजयावर भन्नाट मीम्स व्हायरल

IPL 2026 Memes: SRH चा खेळ खल्लास! राजस्थाननं घेतला CSK चा बदला, RR च्या विजयावर भन्नाट मीम्स व्हायरल

Rajasthan Royals Beat SRH by 47 Runs: राजस्थान रॉयल्सनं ४७ धावांनी विजय मिळवत सनरायझर्स हैद्राबादला स्पर्धेतून बाहेर काढलं. या मॅचवर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. नेटकरी SRH ची फिरकी घेत आहेत.

राजस्थान रॉयल्सनं ४७ धावा राखून सनरायझर्स हैद्राबादचा पराभव केला. या पराभवासोबतच हैद्राबादचा संघ IPL 2026 स्पर्धेतून बाहेर पडला. तर दुसरीकडे राजस्थाननं दुसऱ्या क्वालिफायर फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान, राजस्थानचे चाहते सध्या खुश आहेत. तर दुसरीकडे हैद्राबाद संघाची फिरकी घेतली जात आहे. अगदी चेन्नई सुपर किंग्सचे चाहतेदेखील त्यांच्यावर मीम्स शेअर करत आहेत. चला तर मग पाहूया SRH vs RR सामन्यावर व्हायरल होणारे मीम्स.या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं प्रथम फलंदाजी करत २४३ धावा केल्या होत्या.​


२४३ धावांचा पाठलाग करताना हैद्राबादचा संघ १९६ धावांवर कोसळला आणि ४७ धावांनी पराभूत झाला.​


वैभव सूर्यवंशी या सामन्याचा हिरो ठरला. त्यानं अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावा केल्या.​


हैद्राबादची सुरुवात फारच खराब झाली होती. धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला, तर ट्रेव्हिस हेड १७ धावांवर बाद झाला.​


जोफ्रा आर्चरनं या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. त्यानं सुरुवातीपासूनच SRH च्या फलंदाजांना बॅकफूटवर ढकललं होतं.​


SRH साठी प्रफुल हिंगेनं ३ विकेट्स घेतल्या. त्याला वगळता एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.​


राजस्थान रॉयल्सला IPL फायनलमध्ये पोहोचायचं असेल, तर पुढच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करावा लागेल.​

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims