Dailyhunt
​IPL 2026 Memes: 'त्या एका हँडशेकनं फिरलं मुंबई इंडियन्सचं नशिब', MI चा आणखी एक पराभव, फॅन्स मीम्समधून करताहेत ट्रोल

​IPL 2026 Memes: 'त्या एका हँडशेकनं फिरलं मुंबई इंडियन्सचं नशिब', MI चा आणखी एक पराभव, फॅन्स मीम्समधून करताहेत ट्रोल

IPL 2026: मुंबई इंडियन्स सध्या फारच खराब फॉर्ममध्ये आहेत. अगदी २४३ धावा देखील MI ला वाचवता आल्या नाहीत. SRH नं पहिल्या १० ओव्हरमध्येच मुंबईच्या हातून सामना हिसकावून घेतला. त्यामुळे फॅन्स चिढले असून मीम्सच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

मुंबई इंडियन्सनं आणखी एक मॅच गमावली. सनरायझर्स हैद्राबादनं वानखेडे स्टेडियमवर MI चा पराभव केला. आश्चर्य म्हणजे तब्बल २४३ धावांचं आव्हान सुद्धा मुंबईला वाचवता आलं नाही. त्यामुळे फॅन्स नाराज आहेत. आणि मीम्सच्या माध्यमातून आपल्याच संघाला ट्रोल करताहेत. चला पाहूया MI vs SRH मॅचवर व्हायरल होणारे मीम्स.
(फोटो सौजन्य - @sarcastic_us/X.com)या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं पहिली फलंदाजी करून २४३ धावा केल्या होत्या.​


सनरायझर्स हैद्राबादनं ८ बॉल आणि ६ विकेट्स राखून २४९ धावा करत विजय मिळवला.​


या पराभवासोबत मुंबईनं आणखी दोन पॉइंट्स गमावले आणि पॉइंट टेबलमध्ये ९ व्या क्रमांकावर पोहोचले.​


या मॅचमध्ये रोहित शर्मा खेळला नाही. त्यामुळे त्याचे फॅन्स नाराज आहेत. आणि कर्णधार हार्दिक पांड्यावर टीका करताहेत.​


मुंबईसाठी Ryan Rickelton ने ५५ बॉलमध्ये १२३ धावा केल्या. पण हैद्राबादच्या ट्रेव्हिस हेडनं ३० बॉलमध्ये ७६ धावा करून मुंबईच्या हातून सामना हिसकावून घेतला.​


मुंबई इंडियन्सची गोलंदाजी यावेळी फारच खराब कामगीरी करतेय. जसप्रिम बुमराहला सुद्धा विकेट्स मिळत नाहीये. त्यानं तर ४ ओव्हरमध्ये तब्बल ५४ धावा दिल्या.​

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims