मुंबई : आयपीएल 2026 च्या फायनल सामन्यामध्ये आरसीबीने गुजरातला घरच्या मैदानावर पराभूत केले. गुजरात टायटन्स संघाचा पाच विकेटने पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरला आहे.
या सामन्यामध्ये विराट कोहलीने आपल्या आयपीएल करियरमधील वेगवान अर्धशतक करत महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरात संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना १५५-८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आसीबीने १८ व्या ओव्हरमध्ये हा सामना खिशात घातला. १८ नंबरची जर्सी घालणाऱ्या विराटने १८ व्या ओव्हरमध्येच षटकार मारत विजय मिळवला. विराटने नाबाद ७५ धावांची खेळी केली. आयपीएलच्या इतिहासामध्ये रजत पाटील सलग आयपीएलची ट्रॉफी जिंकणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. याआधी हा विक्रम महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्माच्या नावावर हा रेकॉर्ड आहे.
आरसीबीने टॉस जिंकत गुजरातला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले होते. गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराने घेतलेला निर्णय योग्य ठरवत गुजरातला शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना आऊट करत सुरूवातीलाच बॅकफूटवर ढकलले होते. शुभमन गिल १० धावा, साई सुदर्शन १२ धावांवर आऊट झाल्याने त्यांचा पाठीचा कणा मोडल्यासारखे झाले होते. एकट्या वॉशिंग्टन सुंदर याने ५० धावांची खेळी करत गुजरातला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले होते. आरसीबीकडून रसिक सलाम दार याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या होत्या.
आरसीबीकडून या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर वेंकटेश अय्यर आणि विराट कोहली यांनी ६२ धावांची सलामी दिली होती.दोघेही गुजरातच्या गोलंदाजांवर तुटून पडले होते, खास करून दुखापती झालेल्या वेंकटेश याने आपले आक्रमण सुरू ठेवले होते. १६ चेंडूत ३२ धावांची खेळी करताना त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले होते. आरसीबीला पहिली विकेट गेल्यावर दुसराही झटका बसला. त्यानंतर विराटने रजत पाटीदारसोबत २६ धावा आणि टीम डेविडसोबत ४१ धावांची केलेली भागीदारी महत्त्वाची ठरली.विकेट जात असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती.
दरम्यान, आरसीबी संघाने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी नावावर करत इतिहास रचला आहे. आरसीबी अशी कामगिरी करणारा तिसरा संघ ठरला आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली २०१० आणि २०११ मध्ये चेन्नईने हा विक्रम रचला होता. विशेष म्हणजे २०१२ च्या फायनलमध्येही धडक मारली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली २०१९ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्स संघाने ही कामगिरी केलेली. आता या यादीमध्ये आरसीबीने आता स्थान मिळवले असून २०२७ साली परत एकदा ट्रॉफी जिंकत हॅट्रिक करण्याची सधी आरसीबीच्या संघाला असणार आहे.

