Dailyhunt
IPO चा गुलीगत धोका, बाजाराच्या मूड स्विंगने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले; सूचीबद्ध होताच कवडीमोल राहिली किंमत

IPO चा गुलीगत धोका, बाजाराच्या मूड स्विंगने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले; सूचीबद्ध होताच कवडीमोल राहिली किंमत

Share Market Update: नवीन आर्थिक वर्ष 2026-27 ची सुरुवात झाली आहे, पण शेअर बाजारातील परिस्थिती जशास तशी आहे. देशांतर्गत बाजारात गेल्या वर्षभरातील घसरणीतून सावरत होता की इत्यात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला चढवला ज्यामुळे बाजारावर दबाव आणखी वाढला असून आता गुंतवणूकदार आणखी सतर्क झाले.

या दरम्यान मागील आर्थिक वर्ष 2025-26 देशांतर्गत बाजारात, विशेषतः आयपीओ मार्केटमध्ये घातक ठरले.

केवळ एका वर्षात मुंबई शेअर बाजार 5 टक्के कोसळला तर निफ्टी50 निर्देशांकही 4 टक्के घसरला. यादरम्यान बाजारात लिस्ट झालेल्या सध्या निम्म्याहून अधिक आयपीओ तोट्यात आले असून प्रत्येक तीनपैकी दोन, म्हणजेच अंदाजे 66% आयपीओ सध्या इश्यू किमतीपेक्षा खाली घसरले आहेत.

70% पर्यंत घसरले आयपीओ शेअर्स
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात आलेले अंदाजे 15 आयपीओ त्यांच्या लिस्टिंग किमतीपेक्षा 50% पेक्षा जास्त आपटले आहेत. यादरम्यान ग्लोटिस, व्हीएमएस टीएमटी, मंगल इलेक्ट्रिकल्स, जिंकुशाल इंडस्ट्रीज आणि श्री राम ट्विस्टेक्स यांसारख्या शेअर्समध्ये 70% पर्यंत घसरण झाली आहे.

आयपीओ बाजारातील घसरणीचे कारण काय?

अनेक कंपन्यांनी उच्च मूल्यांकनावर बाजारात आयपीओ लाँच केले. परिणामी, बाजारात तेजी असताना गुंतवणूकदारांनी आयपीओ सबस्क्राइब केले पण, बाजार घसरतच त्यांची कामगिरीही ढासळली. याशिवाय अलीकडच्या इराण-अमेरिका/इस्रायल युद्धामुळेही बाजारात गोंधळ निर्माण झाला. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली असून कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे महागाई व विकासाबद्दलची चिंता वाढली. परिणामी, गुंतवणूकदार जोखीम पत्करण्यास कचरत आहेत.

आता नवीन आर्थिक वर्षात आयपीओ बाजारात काय होणार?
अशाप्रकारे आता गुंतवणूकदारांची नजर नव्या वर्षाकडे लागून असेल. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या आयपीओंचा GMP सध्या शून्य असून लिस्टिंगनंतरची ही घसरण सुधारणा आहे, संरचनात्मक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यादरम्यान PL कॅपिटल मार्केट्सचे उदय पाटील म्हणाले की, बाजारातील अस्थिरतेमुळे कंपन्या आता आयपीओ आणण्याबाबत सावधगिरी बाळगत आहेत. पण आयपीओची पाइपलाइन मजबूत असल्याचा गुंतवणूक बँकरचा विश्वास आहे. इक्विपस कॅपिटलचे भावेश शाह म्हणतात की बाजारातील परिस्थिती स्थिर होताच आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परत येताच, प्राथमिक बाजार पुन्हा उभारी घेऊ शकतो.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims