Telangana Store's Smart Marketing Move Recharge and Get Free Petrol: '३५० च्या रिचार्जवर १ लीटर पेट्रोल फ्री', दुकानदाराची अनोखी स्कीम, लोकांनी फुकटात केली जाहिरात, तेलंगणामधील दुकानात झाली मोठी गर्दी, व्हिडीओ होतोय व्हायरल
हल्लीचा जमाना हा मार्केटिंगचा आहे. प्रोडक्ट चांगलं असो वा नसो, पण मार्केटिंग दमदार असेल तर ग्राहक खरेदीसाठी दुकानात गर्दी करतात, हे सध्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर एका मोबाईल सर्व्हिस सेंटरच्या मालकाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी स्कीम जाहीर केली. जर तुम्ही मोबाईलमध्ये ३५० रुपयांचा रिचार्ज केला, तर सोबत १ लिटर पेट्रोल मोफत मिळेल. आणि काय सांगता, लोकांनी रिचार्ज करण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या दुकानाची देशभरात चर्चा आहे.हे पाहा लोकांनी अशी केलीये गर्दी
इराण आणि अमेरिकेतील संघर्षाचे परिणाम इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. देशभरात काही ठिकाणी गॅस सिलिंडर आणि पेट्रोलची थोड्या प्रमाणात टंचाई जाणवत होती. अर्थात, केंद्र सरकारने त्वरीत उपाययोजना करून या समस्येवर तोडगा काढला. पण याच संधीचा फायदा घेत एका दुकानदाराने स्वतःचा नफा करून घेतला.
ही घटना तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील डम्मापेटा येथे घडली. नव्याने सुरू केलेल्या मोबाईल सर्व्हिस सेंटरबद्दल लोकांना माहिती मिळावी आणि चांगली जाहिरात व्हावी, यासाठी मालकाने ही अनोखी स्कीम सुरू केली. ३५० रुपयांचा रिचार्ज करा आणि १ लिटर पेट्रोल फ्रीमध्ये घ्या. आणि काय आश्चर्य, ही मार्केटिंग टेक्निक खरंच कामी आली. या दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. बहुतांश लोक १ लिटर पेट्रोल फ्रीमध्ये मिळेल या आशेने आले. पण सोबतच ३५० रुपयांचा रिचार्ज केल्यामुळे दुकानदारालाही चांगला फायदा झाला.
१ लीटर पेट्रोलसाठी लोकांनी लावल्या रांगा

हे व्हिडिओ तुम्ही @TeluguStride आणि @TeluguScribe या एक्स अकाउंटवर पाहू शकता. आतापर्यंत हे व्हिडिओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिले असून दुकानदाराच्या जाहिरात तंत्राचं कौतुक केलं आहे. दरम्यान, तेलंगणा नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यात पुरेसा इंधन साठा असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यभरात दररोज १८ हजार किलोलिटरपेक्षा अधिक इंधन पुरवठा होत असून, ४० ते ४५ दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये आणि इंधनासंबंधित अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. असो, ही फ्री पेट्रोल स्कीम तुम्हाला कशी वाटली? तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)