Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Jalgaon Accident : टोलनाक्यावर गॅस टँकरची पाठीमागून ट्रकला धडक, जागीच आग लागल्याने दोघांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Jalgaon Accident : टोलनाक्यावर गॅस टँकरची पाठीमागून ट्रकला धडक, जागीच आग लागल्याने दोघांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

निलेश पाटील, जळगाव : पारोळा-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सबगव्हाण टोलनाक्याजवळ एका गॅस टँकरनं दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

तर या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. ही घटना टोल नाक्यावर घडली असल्याने त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

नेमका अपघात कसा झाला?

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सबगव्हाण टोल नाक्याजवळ संध्याकाळी ही घटना घडली. टोल नाक्यावर एका गॅस टँकरने पाठीमागून एका ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातानंतर टँकरला आग लागली, या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सदर गॅस टँकरला आग लागल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं असताना प्रशासनानं तत्काळ दखल घेत पारोळा अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांना तसेच रुग्णवाहिका चालकांना तत्काळ घटनांसाठी दाखल केलं.

दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की, आग विझवण्यासाठी सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आलं. अपघातानंतर वाहनाला आग लागल्यानंतर आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. परंतु अशी कुठलीही दुर्घटना घडली नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या टँकरमधील असलेल्या किती लोकांचा बळी गेला असेल याचा अंदाज अजून आलेला नसून सदर वाहनातून शव बाहेर काढल्यानंतरच समजणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

दोन ते तीस तास वाहतूक ठप्प

टँकरला आग लागल्यानंतर पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन, रुग्णवाहिका प्रशासन व अग्निशामक बंबाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यामध्ये पारोळा धुळे येथील अग्निशामक बंबांना याठिकाणी बोलवण्यात आलं होतं. अपघातामुळे आणि गॅस टँकरला लागलेल्या आगीमुळे सुमारे राष्ट्रीय महामार्गावरील दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.

सदर घटना ही सबगव्हाण टोल नाक्याजवळ घडली असून, ही घटना कशी घडली? याबाबत टोलनाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत पोलीस सकाळी सदर घटना कशी घडली? हे निश्चित करणार असून याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती पोलिसांना मिळाली नसून, टँकरमधील ड्रायव्हर आणि क्लिनर या दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची पुण्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims