WWE Wrestlers Get a Marathi Makeover: WWE मधील लोकप्रिय रेसलर्स हे समजा मराठी असते तर त्यांची नाव काय ठेवली असती? चला जाणून घेऊया. ही फोटो गॅलरी पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
WWE फाईट्स आपल्यापैकी अनेकांनी पाहिल्या असतील.WWE फाईट्स आपल्यापैकी अनेकांनी पाहिल्या असतील. मोठमोठे पैलवान एकमेकांशी भिडतात, एकमेकांना उचलून जमिनीवर आदळतात, लाथा-बुक्क्यांची बरसात करतात. त्यामुळे WWE शोची प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. असो, पण विचार करा, जर WWE आपल्या महाराष्ट्रातील शो असता तर खेळाडूंची नावं कशी असती? होय, हीच कल्पना करून marathiminded या इन्स्टाग्राम पेजने एक गंमतीशीर फोटो गॅलरी तयार केली आहे. चला तर मग पाहूया, तुमच्या आवडत्या रेसलर्सची मराठी नावं काय असती?
(फोटो सौजन्य - marathiminded/Instagram)
स्टोन कोल्ड स्टिव्ह ऑस्टिन

हा WWE मधील अत्यंत लोकप्रिय रेसलर्सपैकी एक होता. ९० च्या दशकात अॅटिट्यूड एरामध्ये त्याची वेगळीच क्रेझ होती.
(फोटो सौजन्य - marathiminded/Instagram)
द रॉक

ड्वेन जॉन्सन हा WWE मध्ये द रॉक म्हणून ओळखला जायचा. सध्या तो हॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम करतो. तो आपल्या इलेक्ट्रिफायिंग स्टाईलसाठी प्रसिद्ध होता.
(फोटो सौजन्य - marathiminded/Instagram)
ट्रिश स्ट्रॅटस

ही WWE मधील ब्युटी विथ ब्रेन म्हणून ओळखली जायची. तिनं ७ वेळा WWE वुमन्स चॅम्पियनशिप टायटल जिंकलं आहे. ९० च्या दशकात हॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही तिची चर्चा अधिक होती.
(फोटो सौजन्य - marathiminded/Instagram)
जॉन सीना

हा WWE मधील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचं फॅन फॉलोइंग जगभरात आहे. रॉकप्रमाणेच जॉनने सुद्धा रेसलिंगमधून निवृत्ती घेतली असून आता तो सिनेमांमध्ये झळकत आहे.
(फोटो सौजन्य - marathiminded/Instagram)
लिटा

ही WWE मधील एक धाडसी महिला रेसलर म्हणून ओळखली जायची. ती आपल्या हाय-फ्लायिंग मूव्ह्ससाठी प्रसिद्ध होती. ती ४ वेळा WWE वुमन्स चॅम्पियन बनली आहे.
(फोटो सौजन्य - marathiminded/Instagram)
ट्रिपल एच

तो आपल्या स्टायलिश आणि दमदार एन्ट्रीसाठी प्रसिद्ध होता. तो हातोड्याने प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करायचा. त्यामुळे त्याला द गेम हे टायटल प्रेक्षकांनी दिलं होतं.
(फोटो सौजन्य - marathiminded/Instagram)
द अंडरटेकर

हा रेसलिंग इतिहासातील सर्वात लोकप्रिय रेसलर्सपैकी एक आहे. मृत्यूवर विजय मिळवलेल्या व्यक्तीप्रमाणे त्याची ओळख होती. जेव्हा त्याने WWE मधून निवृत्ती घेतली, तेव्हा प्रेक्षक अक्षरशः ढसाढसा रडत होते, यावरून त्याची फॅन फॉलोइंग लक्षात येते.
(फोटो सौजन्य - marathiminded/Instagram)

