जावेद जाफरीमाझ्यासाठी 'महाराष्ट्र दिन' हा स्वाभिमान, मत्याग, कृतज्ञता, कल्पना, कला आणि लोकांच्या अखंड प्रवाहाची सुंदर आठवण करून देणारा दिवस आहे. या महाराष्ट्र भूमीतील रत्न अर्थात इथले लोक सतत नवनवीन सीमा ओलांडत पुढे जातात आणि त्या प्रवासात एक वेगळीच ताकद जाणवते.
माझा जन्म याच मातीत झाला आणि माझ्या कलेचा श्रीगणेशाही इथेच झाला, याचा मला मनापासून अभिमान वाटतो.
माझं मन 'आमची मुंबई' आणि 'आपला महाराष्ट्र' याच ठिकाणी येऊन विसावतं
इथल्या प्रेक्षकांनी मला कधी 'मेरी जंग'मधला खलनायक म्हणून स्वीकारलं, तर कधी माझ्या नृत्यावर भरभरून प्रेम मंचावरून मी बोललो, तेव्हा माझ्या शब्दांमागे इथल्याच लोकसंस्कृतीचीकेलं, 'बुगी वुगी'च्या मंचावरून मी बोललो, तेव्हा माझ्या शब्दांमागे इथल्याच लोकसंस्कृतीची आणि भाषेची लय दडलेली होती. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. इथल्या मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर माझा दृढ विश्वास आहे. या मातीचा सुगंध माझ्या प्रत्येक कामात दरवळतो. मी कुठेही गेलो तरी शेवटी माझं मन 'आमची मुंबई' आणि 'आपला महाराष्ट्र' याच ठिकाणी येऊन विसावतं.
मराठी माणसाचं प्रेम आणि या राज्याची महान संस्कृती हीच माझी खरी पुंजी आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रानं मला असंख्य आठवणी, धडे आणि असे क्षण दिले आहेत, ज्यांनी मला घडवलं आहे. आज 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन ५'मध्ये सहभागी होताना, प्रत्येक स्पर्धकात मला तीच ज्वाला दिसते; स्वतःला व्यक्त करण्याची, प्रगती करण्याची आणि चमकण्याची भूक. आज मी फक्त एका राज्याचा नागरिक नाही, तर सतत विकसित होणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या महान राष्ट्राचा.. महाराष्ट्राचा माणूस आहे; ज्याचा मला अभिमान आहे.
जावेद जाफरी यांच्या करिअरबद्दल ....
जावेद जाफरी यांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेरी जंग' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील 'विक्रम' या नकारात्मक भूमिकेनं आणि त्यांच्या 'बोल बेबी बोल' या गाण्यातील डान्सने प्रेक्षकांना भुरळ घातली. सुरुवातीच्या काळात नकारात्मक भूमिकांनंतर त्यांनी आपला मोर्चा विनोदी भूमिकांकडे वळवला.'धमाल' मालिकेतील 'मानव' हे त्यांचे पात्र आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. याशिवाय 'सलाम नमस्ते', 'ता रा रम पम', '३ इडियट्स' आणि 'बला' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. लवकरच ते बहुप्रतिक्षित 'धमाल ४' आणि 'दे दे प्यार दे २' मध्येही झळकणार आहेत.
'बूगी वूगी' आणि नृत्याची जादू
भारतात डान्स रिअॅलिटी शोची क्रेझ निर्माण करण्याचे श्रेय प्रामुख्याने जावेद जाफरी यांना जाते. 'बूगी वूगी' या शोच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे परीक्षकाची भूमिका पार पाडली. त्यांची डान्स स्टाइल आणि त्यातील सहजता आजही तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते.

