Dailyhunt
जिवाभावाच्या मित्राच्या निधनाने खचला Salman Khan, ४२ वर्षांच्या आठवणींना दिला उजाळा, पोस्ट व्हायरल

जिवाभावाच्या मित्राच्या निधनाने खचला Salman Khan, ४२ वर्षांच्या आठवणींना दिला उजाळा, पोस्ट व्हायरल

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळा आहे. त्याचा जिवलग मित्र सुशील कुमार, यांचे निधन झाले आहे. सलमान आणि सुशील कुमार यांची 45 वर्षांची मैत्री होती. सुशील कुमार त्याच्यासाठी भावासारखा होता.

प्रत्येक कठीण प्रसंगी ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचे. सुशीलच्या निधनावर सलमानने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सलमान खानच्या जिवलग मित्राचे निधन


आपला मित्र सुशील याच्या आठवणींना उजाळा देत, सलमानने एक भावुक पोस्ट शेअर केली. त्या दोघांचे एकत्र असलेले अनेक फोटो त्याने शेअर केले. त्याने लिहिले, "हा माणूस 42 वर्षांपासून माझा भाऊ होता,सर्वात उत्तम, सर्वात दयाळू आणि सर्वांना मदत करणारा... संकट कितीही गंभीर असो, तो नेहमी हसतमुख असायचा आणि आनंदाने नाचायचा. अगदी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही, त्याने कधीच दुःख किंवा तणावाला स्वतःवर भारी पडू दिले नाही. आर्थिक, भावनिक किंवा शारीरिक अशा कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करताना तो नेहमी म्हणायचा, 'काही फरक पडत नाही; हे दुःख निघून जाईल आणि सर्व काही पुन्हा नीट होईल.'

'तुझ्यासाठी अश्रू नाहीत, मित्रा... केवळ आठवणी आणि हसूच.'


सलमानने पुढे लिहिले, 'त्याचे नाव सुशील कुमार होते. तुला निरोप, मित्रा... तू एका सच्च्या माणसाप्रमाणे आयुष्य जगलास. तसेच एका 'हेवीवेट चॅम्पियन'प्रमाणे मृत्यूला आव्हान दिले. तुझ्यासाठी अश्रू नाहीत, मित्रा... केवळ आठवणी आणि हसूच आहे. माझा मित्र चेहऱ्यावर हास्य ठेवून या जगातून निरोप घेऊन गेला. शाब्बास, मित्रा. काही लवकर जातात, तर काही उशिरा. अखेरीस, प्रत्येकजण निघून जातोच;पण ते कधी आणि कसं, हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे, आपल्या मागे एक असा वारसा सोडून जा, जो कायम स्मरणात राहील. आता जा, आणि तुझ्या सिगारेट्स व व्हिस्कीचा मनसोक्त आनंद घे. चीअर्स, मित्रा... मला वाटतं, तुझी मला खूप आठवण येईल.'

मृत्यूबाबत सलमान खानचे मत


मित्राच्या निधनानंतर, सलमानने आणखी एक पोस्ट लिहिली; ज्यामध्ये त्याने जीवन आणि मृत्यूविषयीचे आपले विचार मांडले. त्यासोबतच, त्याने एक फोटोही शेअर केला, फोटोत तो आपले अश्रू सावरताना दिसत आहे. सलमानने लिहिले: "ज्याला जाणे अटळ आहे, त्याला रोखण्याचा प्रयत्न कधीही करू नये. ज्याला 'त्याने' बोलावले आहे, तो नक्कीच निघून जाणार. या बोलावण्यामागे चार कारणे असतात:

१. एकेक करून, शेवटी प्रत्येकालाच जावे लागते.
२. चांगली माणसे लवकर वरती बोलावली जातात.
३. ही एक अशी संधी असते, ज्याद्वारे तुम्ही 'धरणीमातेचे' देणे म्हणजेच 'भाडे', 'EMI' किंवा 'GST' अखेर फेडू शकता; जे तुम्ही अद्याप फेडले नव्हते.
४. सर्वात शेवटी जाणारे लोक म्हणजे दुष्ट, भ्रष्ट आणि अप्रामाणिक व्यक्ती असतात. ते अगदी शेवटी निघून जातात आणि आपण त्यांचीच वाट पाहत असतो. पूर्वीच्या काळी, जर एखाद्या दुष्ट माणसाने गर्दीत मान वर काढण्याचे धाडस केले असते, तर त्याची मान धडावेगळी केली जात असे. पण ती प्रथा कधी बंद झाली? आता तर, त्यांच्या कर्माचे ओझे त्यांच्या नातेवाईकांवर पडते, पण ते स्वतः मात्र त्याबाबत पूर्णपणे नामानिराळे राहतात. आनंद घे, माझ्या मित्रा. तू या पृथ्वीला मागे सोडून गेलास. मी तुझ्या पत्नीशी बोललो आणि तिला हे ठाऊक आहे की, तू तिला मागे सोडून दुसऱ्या कोणातरी एका व्यक्तीसाठी निघून गेलास."

आपल्या मित्रासाठी सलमानने पुढे लिहिले


'काश! मला शिव्या देता आल्या असत्या, राग आला असता, किंवा रडता आलं असतं. ज्या गोष्टी मी सहसा सहज करतो तरीही तुझ्यासाठी एकही अश्रू ढाळला जात नाही. सोशल मीडियावर लोक "RIP," "RSVP," आणि अशाच प्रकारच्या पोस्ट करत आहेत. तू गेलास, भावा. मी तुला बॉडी म्हणणार नाही, कारण तुला खरंतर कधी शरीर नव्हतंच त्यामुळे मी तुला फक्त सुशील कुमार म्हणेन. "रेस्ट इन पीस" सुद्धा नाही म्हणार. भानावर ये, भावा! जाऊन थोडी मजा कर. चीअर्स, माझ्या भावा. सगळं काही इतकं छान चाललं होतं; आता तू माझं लीव्हर आणि किडनी खराब करणार आहेस.'

अंगरक्षक शेराचीही प्रतिक्रिया


सलमानचा अंगरक्षक शेरा यानेही या पोस्टवर एक प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले आहे, "बॉस, आपण तुमचा सर्वात जवळचा मित्र गमावला आहे. तुझी खूप आठवण येतेय, सुशील."

गेल्या काही वर्षांत सलमान खानने गमावले हे मित्र


गेल्या काही वर्षांत सलमानने अनेक मित्रांना गमावले आहे. 2024 मध्ये, त्याचा मित्र आणि राजकिय व्यक्तिमत्व बाबा सिद्दीकी यांचे निधन झाले; 12 ऑक्टोबर रोजी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सलमान पूर्णपणे हादरून गेला होता. दरम्यान, 2017 मध्ये त्याचा सहकलाकार आणि मित्र इंदर कुमार यांचे निधन झाले. 2025 मध्ये सलमानने आपला मित्र आणि अभिनेता पंकज धीर यांनाही गमावले. पंकज धीर यांचा मुलगा निकितिन धीर याच्याशीही सलमानचे खूप जवळचे नाते होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims