Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कालपर्यंत होता बेरोजगार; आज कमावतो ४५ हजार, एका रेंटल स्कूटरनं बदललं नशिब, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

कालपर्यंत होता बेरोजगार; आज कमावतो ४५ हजार, एका रेंटल स्कूटरनं बदललं नशिब, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

Gig Economy India: उत्तर प्रदेशातील एका बेरोजगार तरुणानं ई-स्कूटरच्या मदतीने महिन्याला ४५ हजार रुपयांपर्यंत कमाई केली. या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी त्याच्या मेहनतीचं कौतुक करत आहेत.

देशभरात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सध्या ऑफिस बॉयच्या नोकरीसाठीसुद्धा कित्येक किलोमीटरच्या रांगा लागताना दिसत आहेत. अगदी इंजिनिअरिंग केलेली लोकंसुद्धा छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये काम करताना दिसत आहेत. दरम्यान, अशाच एका बेरोजगार तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा तरुणसुद्धा नोकरीसाठी दारोदार भटकत होता. पण अखेर एका इलेक्ट्रिक स्कूटरनं त्याचं नशीब बदललं. कालपर्यंत एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणारा हा तरुण आज महिन्याला ४५ हजार रुपये कमावत आहे.कसं बदललं नशीब?

आकाश गुप्ता असं या तरुणाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील एका छोट्याशा गावात राहतो. त्यानं भाड्यानं एक ई-स्कूटर घेतली आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम सुरू केलं. या कामातून त्याला चांगले पैसे मिळत आहेत. दिवसाला तो सरासरी १५०० रुपयांची कमाई करतो. या स्कूटरसाठी त्याला आठवड्याला २१०० रुपये भाडं द्यावं लागतं. पण भाड्याचे पैसे दिल्यानंतरही त्याच्या हातात महिन्याला ४५ हजार रुपये उरतात, असा अनुभव त्यानं या व्हिडीओमध्ये सांगितला आहे. तो म्हणतो, कालपर्यंत तो बेरोजगार होता. पण आता त्याला इतके पैसे मिळत आहेत की, तो कुटुंबाची जबाबदारी उचलू शकतो.


कंपनीच्या CEO नं केलं कौतुक​



हा व्हिडीओ Zypp Electric चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता यांनी शेअर केला आहे. त्यांनी या तरुणाचं कौतुक करत त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हा व्हिडीओ १५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत तरुणाचं कौतुक केलं आहे. कारण जेव्हा त्याला "पैशांचं काय करणार?" हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यानं "सगळे पैसे घरी पाठवणार" असं उत्तर दिलं. हे उत्तर नेटकऱ्यांना आवडलं असून, ते त्याच्या मेहनतीचं कौतुक करत आहेत.

या प्रकरणातील लक्षवेधी बाब म्हणजे नोकरी नाही म्हणून रडत बसण्याऐवजी तरुणानं जे मिळेल ते काम स्वीकारलं आणि आज तो चांगली कमाई करत आहे. तुम्ही आपल्या आसपास असे अनेक उच्चशिक्षित तरुण पाहिले असतील, जे चांगल्या पगाराच्या नोकरीच्या प्रतीक्षेत अनेक वर्ष घरातच बसून राहतात आणि बेरोजगारीसाठी प्रशासनाला दोष देतात. पण मोठमोठे उद्योजक सांगतात, सुरुवात मिळेल त्या कामापासून करा आणि सोबत आवडत्या क्षेत्रात धडपड करा. कारण खिशात थोडेफार पैसे असतील, तर नैराश्य येत नाही आणि तुम्ही अधिक आत्मविश्वासानं रोजगारासाठी प्रयत्न करू शकता.

(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims