Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kamlesh Sawant : 'तुम्हाला मारावंसं वाटतंय', 'दृश्यम' पाहून बायकांनी दिलेल्या प्रतिक्रिया; कमलेश सावंत यांनी सांगितला किस्सा

Kamlesh Sawant : 'तुम्हाला मारावंसं वाटतंय', 'दृश्यम' पाहून बायकांनी दिलेल्या प्रतिक्रिया; कमलेश सावंत यांनी सांगितला किस्सा

मुंबई - मराठी अभिनेते कमलेश सावंत यांनी 'दृश्यम' या सिनेमात पोलीस अधिकारी गायतोंडेची भूमिका साकारली होती. कमलेश यांनी ही भूमिका उत्तमरित्या साकारली. पण, त्यांच्यावर प्रेक्षक संतापले होते.

त्याबद्दलचे किस्से कमलेश यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

कमलेश सावंत म्हणाले की, 'मी 'दृश्यम' सिनेमाच्या ट्रायलला जात नव्हतो. बाकी पूर्ण इंडस्ट्री बघून गेली होती. त्यानंतर अंकुश चौधरी सरांचा मला मेसेज आला. ते म्हणाले, 'नाईस परफॉर्मन्स' मी त्यांना विचारलं, 'कुठला सिनेमा' त्यावर ते हसले आणि 'दृश्यम' असं म्हणाले. त्यानंतर मला इंडस्ट्रीतल्या खूप जणांनी फोन केले होते. कारण, त्यांनी सिनेमाची ट्रायल पाहिली होती. सर्वांनी परफॉर्मन्सचं कौतुक केलं. मी तोपर्यंत ट्रायल पाहायला एकदाही गेलो नव्हतो. मग, तेव्हा मला निशिकांत सरांचा रात्री फोन आला. ते म्हणाले, 'चुकून चांगलं काम केलंय…आता स्वत:च्या सिनेमाचा ट्रायल पाहायला एकदा तरी या!' खरंतर, मी थिएटरमध्ये झोपतो म्हणून मी गेलो नव्हतो. पण, सरांचा फोन आल्यावर शेवटच्या दिवशी गेलो. बाजूला एक बाई बसलेली. मध्यांतर होईपर्यंत मी झोपलो होतो. पण, दुसरा अंक नीट पाहिला. पण, ती बाई तेव्हा नव्हती.'

'सिनेमा पाहिल्यावर मी बाहेर आलो आणि तेव्हा मला आमचे एडिटर दिसले. ते मला म्हणाले, 'कमलेशजी तिथे त्या बायका उभ्या आहेत. त्यांनी सांगितलंय या नीच माणसासमोर आम्ही अजिबात येणार नाहीये. पण, त्यांना सांगा परफॉर्मन्स चांगला होता.' माझं असं झालं, ही कोणती प्रतिक्रिया आहे.'


सिनेमा पाहिल्यावर बायकांच्या प्रतिक्रिया

'तेवढ्यात एक बाई हिंमत करून माझ्याजवळ आली आणि ती म्हणाली, 'आपके मुंह पर थूकना चाहती हूँ….पण, तुम्ही चांगलं काम केलंय.' मग, दुसरी बाई आली ती म्हणाली, 'तुम्हाला चपलेनं मारवंसं वाटतंय, पण, तुम्ही काम चांगलं केलंय.' मी तेव्हा विचार केला जातो बाबा घरी, कोणीतरी बाई येऊन खरंच मारेल. मी लगेच गाडीने कळव्याला माझ्या घरी पोहोचलो आणि बायकोला सगळं सांगितलं. तिला विचारलं म्हटलं मी इतकं काय वाईट केलंय की, त्या बायका मला असं काय-काय बोलल्या. कारण, माझा तो पहिला अनुभव होता. पण, नंतर माझ्याबरोबर लोक फोटोही काढत नव्हते. बायका तोंडावर अपमान करून जायच्या.' असं कमलेश यांनी 'मित्र म्हणे' या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims