Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kangana Ranaut On Baba Ramdev : ते माझ्या बेडरुममध्ये वटवाघुळासारखे लटकलेले का? कंगना रणौत अन् बाबा रामदेव यांची शाब्दिक चकमक

Kangana Ranaut On Baba Ramdev : ते माझ्या बेडरुममध्ये वटवाघुळासारखे लटकलेले का? कंगना रणौत अन् बाबा रामदेव यांची शाब्दिक चकमक

भिनेत्री कंगना रणौत सध्या राजकिय प्रकरणात बरीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिला न पटलेले मुद्दे अगदी बेधकपणे मांडते. गेल्या काही दिवसांत तिने अनेक सेलिब्रिटींवर जोरदार टीका केली.

यादरम्यान तिचे बाबा रामदेव यांच्याशीही वाद झाले. आता पुन्हा एकदा या प्रकरणाने डोके वर काढले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर शाब्दिक चकमक सुरू आहेत. कंगना रणौतच्या जेन झींसाठी गटार विषयक वक्तव्यानंतर सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. आता या अभिनेत्रीने बाबा रामदेव वटवाघळासारखे माझ्या बेडरुममध्ये लटकले होते का ? असा नवा सवाल kjl पुन्हा एकदा डिवचलं आहे. तिने विचारले, "मी काय पाहिले ते मी तुम्हाला सांगायला हवे."


डीडी न्यूजशी बोलताना कंगना रणौत बाबा रामदेव यांच्याबद्दल म्हणाली, "जेव्हा रामदेव यांची स्वदेशी मोहीम सुरू होती, तेव्हा सरकारनेही त्यांना खूप पाठिंबा दिला होता. काही काळानंतर, सनातन विचारधारा भांडवलशाहीशी संघर्ष करू लागली. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारले गेले. आयुर्वेद आणि योगाच्या पलीकडे जाऊन, ते आता बनियन आणि अंतर्वस्त्रे बनवत आहेत. एक प्रकारे, ते व्यावसायिक बनले आहेत. ते मला विचारतात की मी त्यांचे बालपण आणि तारुण्य पाहिले आहे का? बाबा रामदेव माझ्या बेडरुममध्ये वटवाघळासारखे लटकले होते का? त्यांनी जे पाहिले ते मला सांगायला हवे होते."

खरं तर, सीजेपीच्या आंदोलनादरम्यान कंगना रणौतने 'जेन झीं'ला 'गटर जनरेशन' म्हटले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर तिने स्पष्ट केले की तिचा रोख संपूर्ण पिढीकडे नव्हता, तर अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या काही आंदोलकांकडे होता. एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी अभिनेत्रीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

रामदेव म्हणाले होते - तुमचे बालपण आणि तारुण्य कसे होते?

बाबा रामदेव टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "कंगना रणौतचे बालपण, तिचे तारुण्य आणि तिचे पूर्वीचे पराक्रम कसे होते? मला अशा लोकांबद्दल बोलायचे नाही. हे विकृत मनाचे लक्षण आहे. तिच्या पक्षाने तिच्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे."

बाबा जी, माझ्या तारुण्याची स्वप्ने पाहू नका.

यानंतर, कंगना रणौतनेही तिच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली आणि एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली, ज्यात तिने म्हटले, "बाबा जी, माझ्या तारुण्याची स्वप्ने पाहू नका." कंगना म्हणाली, "माझ्या तारुण्याची किंवा बेडरूमची स्वप्ने पाहू नका. निदान खोटे आणि फसवे वैद्यकीय दावे केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मला फटकारलेले नाही." यावर, बाबा रामदेव यांनी उत्तर दिले की, त्यांना क्षुल्लक लोकांवर भाष्य करायचे नाही.

नीट पेपरफुटीनंतर काही विद्यार्थ्यांनी आपला जीव दिला. यामुळे शिक्षण संस्था किती ढासळली आहे यावर अनेक बाबी समोर येऊ लागल्या. त्यानंतर अभिजीत दीपकेच्या अध्यक्षाखाली दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी देशाच्या युवा पिढी द्वारे आंदोलने केली गेली. या आंदोलनाला सेलिब्रिटी मंडळींचाही मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये भरपूर गदारोळ झाला असला तरी आंदोनल थांबले नाही आणि शेवटी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच. पण या आंदोलना दरम्यान देशाच्या पंतप्रधानांबाबत चुकीचे शब्द वापरले गेले त्यावर कंगनाने राग व्यक्त केला होता. तसेच तिने जेन झी, जेन झी आंदोलन, अभिजीत दीपके व त्यांना समर्थन देणारे सेलिब्रिटी यांवर जोरदार टीका केली.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims