सध्या महाराष्ट्रामध्ये एकच विषय ट्रेंडिंग मध्ये आहे तो म्हणजे तुकाराम मुंढे! मे महिन्यात अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त म्हणून नेमणूक झाल्यानंतर तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये आले.
आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या हॉटेल, ढाबे, कॅन्टीन, औषध बनवणाऱ्या कंपन्या, डेअरी यांसारख्या ठिकाणी छापे मारून हानिकारक माल जप्त केला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कामाचे प्रत्येक स्तरावरून कौतुक होताना पाहायला मिळते. त्यांच्यामुळे हॉटेल इंडस्ट्री ही घाबरली असून आता ग्राहकांना उत्तम दर्जाचे अन्नपदार्थ पुरवण्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. पूर्वी अस्वच्छ ठिकाणी जेवण बनवले जायचे किंवा हॉटेलचे किचन हे कसेही घाणेरडे किंवा अस्वच्छ असायचे. तिथेच ग्राहकांच्या ऑर्डरचे पदार्थ बनवून ते प्लेटीत सजवून सर्व्ह केले जायचे. आत मध्ये ते कुठल्या परिस्थितीमध्ये तयार झालेत यापासून अनभिज्ञ असलेले ग्राहक तसलेच हानिकारक पदार्थ अगदी चवीने खायचे. पुढे या सर्वाचा त्यांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होत होता. तुकाराम मुंढे आल्यापासून या प्रकाराला आळा बसला आहे. जिथे अन्नपदार्थ आणखी आकर्षित दिसावे यासाठी रंगांचा भडीमार करून ते बनवले जात होते ते आता फिके दिसत असले तरीही आरोग्यासाठी हानिकारक नाहीत.
सध्या सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटीं पर्यंत अनेक जण तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत आहे. बरेच जण आता निर्भीडपणे त्यांच्या तक्रारीही त्यांना टॅग करून सांगत आहेत.
अशातच आता मराठी सिने इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले आहे.
केवळ केदार शिंदे च नव्हे तर इंडस्ट्रीतील अनेक जणांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाची दखल घेत त्यांचे कौतुक केले होते. त्यामध्ये ईशा तलवार, देवलीना भट्टाचार्जी यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. केदार शिंदे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ते लवकरच गणा धाव रे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. येथे ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होईल.
तुकाराम मुंढेंच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या बेधडक कारवाईमुळे अनेक हॉटेलमध्ये नीट स्वच्छता राखली जातेय, ते पदार्थ कधी बनवले, कधीपर्यंत टिकणार याच्या तारखा लिहिल्या जात आहेत. पदार्थ आकर्षित दिसण्यासाठी जिथे रंगाचा भडिमार होत होता तिथे आता टॉमेटो, मिरची किंवा बिटाच्या पल्पचा वापर केला जातोय. दुग्धजन्य पदार्थांचा साठाही आता कमी झाला असून जितके गरजेचे तितकेच बनवले जात आहे.

