Dailyhunt
KKR vs PBKS : आयपीएलमध्ये आज केकेआर वि. पंजाब किंग्स आमनेसामने, हेडू टू हेड रेकॉर्ड, पिच रिपोर्टसह हवामान जाणून घ्या

KKR vs PBKS : आयपीएलमध्ये आज केकेआर वि. पंजाब किंग्स आमनेसामने, हेडू टू हेड रेकॉर्ड, पिच रिपोर्टसह हवामान जाणून घ्या

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये १२ वा सामना केकेआर वि. पंजाब किग्स यांच्यात पार पडणार आहे. हा सामना केकेआरच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डन, कोलकाता येथे होणार आहे. संध्याकाळी साडे सातपासून स्टार स्पोर्टस आणि हॉटस्टावर सामना पाहता येणार आहे.

केकेआरने सलग दोन सामने गमावले आहेत. तर पंजाब किंग्सने दोन्ही सामने जिंकत दमदार सुरूवात केलीय.

हेड टू हेड रेकॉर्ड

केकेआर आणि पंजाबमध्ये ३५ सामने झाले असून कोलकाताने २१ सामने तर पंजाबने १३ सामने जिंकले आहेत. यामधील 'कोलकाता'चे २१ पैकी १५ विजय धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. तर घरच्या मैदानावर १५ पैकी १० लढतीत 'कोलकाता'चा विजय मिळवलाय. विद्युतझोतातील २३ सामन्यांत 'कोलकाता' १५-७ असे सरस आहेत. अजिंक्य रहाणे कर्णधार असताना 'पंजाब' विरुद्धच्या एकमेव निकाली सामन्यांत 'कोलकाता'ची हार झाली होती.

पिच रिपोर्ट आणि हवामान

यंदाची कामगिरी 'कोलकाता'चा दोन्ही सामन्यात पराभव, तर 'पंजाब'ची पहिल्या दोन्ही लढतीत बाजी मारलीय. खेळपट्टीचा अंदाज पाहिला तर फलंदाजीस साथ देणारी खेळपट्टी तसेच वेगवान मैदान धावांसाठी पोषक, कमी अंतरावरील सीमारेषा तसेच दवामुळे धावांचा पाठलाग फायदेशीर. सरासरी धावा १७१ या मैदानावर निघतात. हवामानाच्या अंदाजानुसार सामन्याच्या सुरुवातीस जास्त ढगाळ, कमालीची आर्द्रता (सरासरी ७० टक्के) खेळाडूंचा कस पाहणार, दवही आव्हान निर्माण करणार. भारतीय वेधशाळेनुसार मात्र वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सामन्यात काय निर्णायक ?

मुस्तफीझुर रहमान, हर्षित राणा, आकाश दीप, मथीशा पाथीराना यांच्या अनुपस्थितीवर तोडगा अजूनही दूरच आहे. 'कोलकाता' चे २०२४मध्ये विजेतेपद त्यावेळी श्रेयस अय्यर कर्णधार. याच श्रेयसला रोखण्याचे आव्हान आता केकेआरसमोर असणार आहे. फिन अॅलेन, टीम सैफर्ट आणि राचिन रवींद्र यांचा उपयोग करून घेण्यात 'कोलकाता' अपयशी ठरत आहे. वर्ल्ड कप टी-२० मध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या धावा केलेला सैफर्ट अजूनही राखीवच, रोवमन पॉवेल याच्यासाठीही जागा नाही. अर्शदीप सिंग, मार्को यान्सेन, विजयकुमार व्याशाक, युजवेंद्र चहलचा समावेश असलेली 'पंजाब'ची गोलंदाजी समतोल आहे. कूपर कॉनोली यास तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय योग्य ठरत आहे. प्रियांश आर्य-प्रभसिमरन यांच्याकडून छान सुरुवात मिळताना दिसत आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims