ठिपक्यांची रांगोळी या स्टार प्रवाह वरील मालिकेत मानसी वहिनी या भूमिकेतून अभिनेत्री सई कल्याणकर हिने प्रेक्षकांच्या मनात घर केले. सईने यापूर्वीही अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वीच तिने तिच्या चाहत्यांसह ती आई होणार अशी आनंदाची बातमी शेअर केली होती. तेव्हा तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला.
मार्च महिन्यात सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता तिच्या मुलीचा बारसा पार पडला आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अभिनेत्रीच्या लेकीच्या नावाची खूप चर्चा आहे.
अभिनेत्री सई कल्याणकर हिने जेव्हा तिला मुलगी झाली हे जाहीर केलेले तेव्हापासूनच अनेकांना तिच्या नावाबाबत उत्सुकता होती. अखेर तिचं बारसं पार पडलं आणि तिचं नावही समोर आला आहे. सईने तिच्या मुलीचे नाव नभा असे ठेवले आहे. या फोटो सोबत तिने कॅप्शन मध्ये लिहिलेले की अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने आम्ही आमच्या मुलीचं नाव नभा असं ठेवत आहोत. सईच्या मुलीच्या नावाचे अनेक जण कौतुक करत आहेत.
अभिनेत्री सई कल्याणकरच्या मुलीच्या बारशाच्या पोस्टवर ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अप्पूची आई दाखवलेली अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी किती गोड मस्त नाव अशी कमेंट केली आहे. तर शुभविवाह या स्टार प्रवाह वरील मालिकेत खल भूमिकेत दिसलेली अभिनेत्री कुंजिका काळविंट केले सुद्धा तिच्या नावाचे कौतुक केले आहे. सई कल्याणकरची मुलगी नभाच्या बारशाला ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील सहकलाकार सुप्रिया पाठारे, नम्रता प्रधान आणि तन्वी बर्वे यांनी उपस्थिती लावली होती.
नभाच्या बारशाला सुद्धा अगदी तिच्या नावाप्रमाणे साजेशी अशी थीम ठेवली होती. बॅकग्राऊंडला आकाश दाखवलेले. एका ढगांमध्ये इंद्रधनुष्याच्या साथीने नभा असे नाव लिहिलेले. सई ने बारशाच्या प्रसंगी लाल रंगाची सुंदर साडी नेसलेली तर तिचा नवरा डॉक्टर प्रशांत याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. बारशाचे बरेच फोटो शेअर झाले असली तरीही अद्याप मुलीचा चेहरा दाखवलेला नाही.

