Who is Lakshmi Mittal: एकेकाळी ब्रिटनचे गर्भश्रीमंत आणि मूळचे भारतीय अब्जाधीश उद्योजक लक्ष्मी मित्तल सध्या चर्चेत आले आहेत. इंडियन प्रीमियर लीगची (IPL) फ्रँचायझी - राजस्थान रॉयल्स- चे तब्बल 1.65 अब्ज अमेरिकन डॉलर्सना-म्हणजेच अंदाजे 15,600 कोटी रुपयांना- अधिग्रहण केले आहे.
कोण आहेत लक्ष्मी मित्तल" />आपल्या स्टील (पोलाद) व्यवसायासाठी प्रख्यात भारतीय अब्जाधीश लक्ष्मी मित्तल आता क्रिकेटच्या मैदानावरही आपली छाप सोडण्यास सज्ज आहेत. लक्ष्मी निवास मित्तल आणि त्यांचे पुत्र आदित्य मित्तल यांनी आदर पूनावाला यांच्यासोबत मिळून $1.65 अब्ज (सुमारे 15,600 कोटी रुपये) ची बोली लावून राजस्थान रॉयल्समधील सर्वात मोठा हिस्सा काबीज केला, पण लक्ष्मी मित्तल यांच्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. राजस्थानच्या रस्त्यांवरून पुढे येऊन जगातील सर्वात मोठी पोलाद कंपनी, आर्सेलर मित्तल, उभी करणारे लक्ष्मी मित्तल आता अब्जाधीश आहेत. जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफामध्ये मित्तल ग्रुपच्या पोलादाचा वापर करण्यात आला आहे.
'स्टील किंग' म्हणून जगात ओळख
'स्टील किंग' म्हणून जगात ओळख" />जगभर 'स्टील किंग' म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी मित्तल जगातील सर्वात मोठ्या पोलाद कंपन्यांपैकी - आर्सेलर मित्तल - या जागतिक पोलाद कंपनीचे अध्यक्ष आहेत. भारतात जन्मलेल्या मित्तल यांनी आपला व्यवसाय युरोप, अमेरिका आणि आशियामध्ये विस्तारला आणि आता ते जगातील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक आहेत.
लक्ष्मी निवास मित्तल किती श्रीमंत
लक्ष्मी निवास मित्तल किती श्रीमंत" />एकेकाळी ब्रिटनचे गर्भश्रीमंत असलेले लक्ष्मी मित्तल यांची एकूण संपत्ती 31 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 2.7 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. लक्ष्मी मित्तल एकेकाळी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते आणि आजही भारतातील 10 सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी आहेत. लंडनमधील त्यांचे निवासस्थान, केन्सिंग्टन पॅलेस गार्डन्स, जगातील सर्वात महागड्या खाजगी घरांपैकी मानले जाते.
लक्ष्मी निवास मित्तलांचं राजस्थान कनेक्शन काय?
लक्ष्मी निवास मित्तलांचं राजस्थान कनेक्शन काय?" />लक्ष्मी मित्तल यांनी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीची निवड केवळ व्यावसायिक नसून भावनिक निर्णयही आहे. लक्ष्मी मित्तल यांचा जन्म राजस्थानमधील सादुलपूर (चुरू जिल्हा) येथे झाला होता आणि 'आपल्याला जागतिक स्तरावर राजस्थानचा वारसा पुढे न्यायचा आहे,' असे रॉयल्सच्या नव्या मालकांचे म्हणणे आहे. नवीन मालकी बदलानंतर राजस्थान रॉयल्स मैदानावर कसा प्रभाव पाडेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल.
वयाच्या 26 व्या वर्षी परदेशात स्थलांतर
वयाच्या 26 व्या वर्षी परदेशात स्थलांतर" />1976 मध्ये भारतात पोलाद उत्पादनावर अनेक निर्बंध लादले असताना 26 वर्षीय मित्तल इंडोनेशियाला स्थलांतरित झाले. इथे त्यांनी आपला पहिला कारखाना, पीटी इस्पात इंडो, स्थापन केला, जो त्यांच्या जागतिक साम्राज्याची पहिली वीट ठरला. तोट्यात चाललेल्या पोलाद कंपन्या विकत घेऊन त्यांनी नफ्यात आणल्या, जे मित्तल यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य राहिले आणि या धोरणामुळे लक्ष्मी मित्तल जगातील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींपैकी बनले. 2006 मध्ये मित्तल स्टील आणि आर्सेलर यांच्या विलीनीकरणातून आर्सेलरमित्तलची स्थापना झाली, जी आज जागतिक पोलाद बाजारातील प्रमुख कंपनी आहे.
ऐषाराम आणि शाही जीवनशैली
ऐषाराम आणि शाही जीवनशैली" />2004 मध्ये मित्तल यांच्या मुलगी - वनिशा मित्तल - चा पॅरिसमध्ये शाही अंदाजात लग्नसोहळा पार पडला. या लग्नात अंदाजे 2004 मध्ये अंदाजे $60 दशलक्ष (सुमारे 240 कोटी रुपये त्यावेळच्या विनिमय दरानुसार) खर्च केला होता आणि यासह त्यावेळी जगातील सर्वात महागडे लग्न होते आणि आजही जगातील सर्वात भव्य लग्नांपैकी मानले जाते.आणि यासह त्यावेळी जगातील सर्वात महागडे लग्न होते आणि आजही जगातील सर्वात भव्य लग्नांपैकी मानले जाते.
त्याचवेळी, लंडन येथील केन्सिंग्टन पॅलेस गार्डन्समधील त्यांचे निवासस्थान जगातील सर्वात महागड्या निवासस्थानांपैकी असून त्यांच्या घरात त्याच खाणीतील संगमरवर वापरण्यात आला आहे, जिथून ताजमहाल बांधण्यात आला होता असे म्हटले जाते.
क्रीडा अन् समाजसेवेतील योगदान
क्रीडा अन् समाजसेवेतील योगदान" />ऑलिम्पिकमधील भारताच्या खराब कामगिरीमुळे चिंतित होऊन मित्तल यांनी 'मित्तल चॅम्पियन्स ट्रस्ट'ची स्थापना केली. त्यांनी भारतीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्यास सुरुवात केली, जेणेकरून देशाला क्रीडा क्षेत्रात सुधारणा करता येईल. तसेच मित्तल यांनी धर्मादाय कार्यासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांनी लंडनच्या ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट हॉस्पिटलला 15 दशलक्ष पाऊंडची देणगी दिली, जी त्यावेळी हॉस्पिटलला मिळालेली सर्वात मोठी खाजगी देणगी मानली जात होती.

