मुंबई : मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
हवामान विभागाकडून शनिवार आणि रविवार या दोन दिवसांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर आता हवामान विभागाने पुढच्या तीन तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
5 जुलैला कसा पाऊस पडणार?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या तीनही जिल्ह्यांसाठी 5 जुलैला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 6
कोल्हापूर घाट, नाशिक घाट या ठिकाणी देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा घाटात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
6 जुलैला काय परिस्थिती राहणार?

