Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'माझे पूर्वज हिंदूच होते!' ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ, पाकिस्तानमधील हिंदू संस्कृतीचा इतिहास जाणीवपूर्वक पुसला गेल्याचा खुलासा

'माझे पूर्वज हिंदूच होते!' ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ, पाकिस्तानमधील हिंदू संस्कृतीचा इतिहास जाणीवपूर्वक पुसला गेल्याचा खुलासा

Khawaja Asif Statement: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या देशातील शालेय शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम आणि इतिहास लेखनावर अत्यंत गंभीर आणि पाकिस्तानींसाठी अत्यंत वादग्रस्त ठरणारी टीका केली आहे.

नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले असून, 'आमचे पूर्वज हिंदू होते' असे त्यांनी उघडपणे म्हटले आहे. त्यांच्या या खुलाशामुळे स्वतःला कट्टर पाकिस्तानी म्हणवणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना चांगलाच धक्का बसला आहे. या मुलाखतीत त्यांनी नेमके काय म्हटले आहे ते जाणून घेऊया.

'माझे पूर्वज हिंदू होते' - ख्वाजा आसिफ

दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनी समा टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या प्राचीन इतिहासाचा आणि त्यांच्या हिंदू पूर्वजांचा उल्लेख करत पाकिस्तान्यांना जोरदार झटका दिला आहे. ते म्हणाले, 'माझे पूर्वज हिंदू होते. इतकेच नाही तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे पूर्वजही हिंदूच होते. त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.

'माझ्या हिंदू पूर्वजांचे धर्मांतरण केले गेले' - ख्वाजा आसिफ

तसेच आसिफ यांनी एक ऐतिहासिक दाखला देत सांगितले की, 'ताजिकिस्तानमधून शाह हमदान हे एक सुफी संत पायी प्रवास करत काश्मीरमध्ये आले होते. त्यांनी जवळपास 30 वर्षे तिथे वास्तव्य करून काश्मीरी हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतरण केले. माझे पूर्वजही अशाचप्रकारे प्रक्रियेतून मुस्लिम झाले. त्यामुळे आमचे मूळ हे हिंदू संस्कृतीतच आहे. मात्र, जरी माझे पूर्वज हिंदू होते, तरी यामुळे मी कमी पाकिस्तानी आहे असे नाही, मी तितकाच कट्टर पाकिस्तानी आहे.'

पाकिस्तानमध्ये हिंदू संस्कृतीचा इतिहास जाणीवपूर्वक पुसला

पुढे त्यांनी पाकिस्तानच्या पाठ्यपुस्ताकंवर तीव्र नाराजी व्यक्त करत ते म्हणाले, 'पाकिस्तानमध्ये हिंदू शासकांचा आणि भारतीय उपखंडातील गैरवशाली संस्कृतीचा इतिहास जाणीवपूर्वक पुसला गेला आहे. केवळ ते हिंदू होते. याच एका कारणास्तव आम्ही आमच्या शालेय पुस्तकांतून चक्रवर्ती सम्राट अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यासारख्या महान राजांचे धडे काढून टाकेल, यामुळे आजच्या पाकिस्तानी तुरुणांना त्यांच्याच भूमीचा खरा इतिहास आणि संस्कृती काय होती, याची साधी कल्पनाही नाही. आणि याची मला खंत वाटते'. तसेच पुढे त्यांनी असेही म्हटले की, 'जेव्हा मी शिकत होतो तेव्हा, आठवीत असताना माझ्या पाठ्यपुस्तकात मी या सर्व महान व्यक्तीमत्त्वांचा अभ्यास केला आहे.'

पाकिस्तान्यांकडून इतिहासाचे विनाकारण नाट्यीकरण

ख्वाजा आसिफ यांनी अशीही टीका केली की, पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आणि काही इतिहासकारांनी मोहम्मद बिन कासिमसारख्या आक्रमकांना केवळ राजकीय हेतूने नायक म्हणून सादर केले. तसेच, 'इतिहासाकडे तटस्थपणे पाहण्याची गरज असते. जर तुम्ही त्यात अति-उत्साह किंवा धार्मिक रंग भरलात, तर त्याचे निष्कर्ष कधीही योग्य निघत नाहीत. पाकिस्तान्यांनी इतिहासाचे विनाकारण नाट्यीकरण केले आहे.' असे रोकठोक मत त्यांनी मांडले आहे.

ट्रम्प यांच्या अब्राहम करारावर मांडली स्पष्ट भूमिका

दरम्यान, याच मुलाखतीत त्यांनी जागतिक राजकारण आणि इस्रायलशी असलेल्या संबंधाबद्दल पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि इतर मुस्लिम देशांना इस्रायलसोबत अब्राहम करारात सामील होण्यास सांगितले होते. मात्र, ख्वाजा आसिफ यांनी हे आवाहन स्पष्टपणे नाकारले.

पाकिस्तान इस्रायला कधीही मान्यता देणार नाही

ते म्हणाले, 'पाकिस्तान आपल्या मूळ विचारसरणीच्या विरोधात जाऊन असा कोणताही करार करणार नाही. जोपर्यंत 1967 च्या सीमा रेषांच्या आधारे पूर्व यरुशलम ही राजधानी असलेले एक स्वतंत्र आणि सार्वभौम फिलिस्टीन राज्य अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत पाकिस्तान इस्रायला कधीही अधिकृत मान्यता देणार नाही. पाकिस्तानने आपल्या 78 वर्षांच्या इतिहासात इस्रायला कधीही राजनैतिक मान्यता दिलेली नाही आणि भविष्यातही हीच भूमिका कायम राहील.'

पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, ख्वाजा आसिफ यांच्या या वक्तव्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असू, सोशल मिडिया यूजर्सकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims