Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Market Mayhem: शेअर बाजारात मंदीचे वारे! 'होर्मुझ आमच्या ताब्यात' ट्रम्पच्या या विधानाने मार्केटला हुडहुडी, 5 लाख कोटींची राखरांगोळी

Market Mayhem: शेअर बाजारात मंदीचे वारे! 'होर्मुझ आमच्या ताब्यात' ट्रम्पच्या या विधानाने मार्केटला हुडहुडी, 5 लाख कोटींची राखरांगोळी

Share Market News: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील तीव्र चढ-उतारामुळे भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला. व्यापार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक गडगडले.

मुंबई शेअर बाजार 700 हून अधिक अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांकही 250 हून अधिक अंकांनी खाली आला.

अमेरिकेचे इराणवर नवीन हल्ले

अमेरिका आणि इराण यांच्यातील नव्याने सुरू झालेल्या तणावानंतर अमेरिकेसह आशियाई बाजारांमध्ये पडझड झाली. डोनाल्ड ट्रम्प सध्या वॉर मूडमध्ये असल्याचे दिसत असून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. तसेच अमेरिकी सैन्याने इराणवर हल्ल्यांची मालिका सुरू केली, ज्यामुळे तेलाच्या बाजारात खळबळ उडाली आणि जागतिक शेअर बाजारांना झळ बसली.

शेअर बाजार गुंतवणूकदारांना 5 लाख कोटींचा लॉस

सुरुवातीच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील (सेन्सेक्स) 30 शेअर्स गरंगळले. इंडिगो आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली, तर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात अंदाजे 5.60 लाख कोटींची घट झाली असून यामुळे आज बाजार उघडताच गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले.

ट्रम्प यांच्या घोषणेमुळे पुन्हा खळबळ

शेअर बाजारातील घसरणीमागे डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धाचा इरादा कारणीभूत ठरत असून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा युद्धाच्या बिगुल फुंकण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी, ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचे जवळजवळ पूर्ण नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आणि म्हटले की इराणची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर आहे.अमेरिका इराणवर वाटाघाटींसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करणाऱ्या माध्यमांतील वृत्तांनाही ट्रम्प यांनी स्पष्ट फेटाळून लावले.

क्रूडच्या किंमतीत वाढ, बाजारात घबराट

डोनाल्ड ट्रम्प यांच्या होर्मुझबाबत दाव्याचा कच्च्या तेलाच्या किमतींवर थेट परिणाम झाला. ब्रेंट क्रूडच्या किमती 96 डॉलर बॅरलपर्यंत वाढल्या, तर WTI क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल 92 डॉलरवर गेल्या. यामुळे आशियाई शेअर बाजारांमधील वातावरणही बिघडले. जपानचा NIKKEI 1800 हून अधिक अंकांनी घसरला, हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक सुमारे 300 अंकांनी खाली आला आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सुमारे 4% घसरला.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims