Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मासिक अंकज्योतिष सप्टेंबर 2026: मूलांक 3 करिअरमध्ये प्रगती, प्रतिष्ठेत वाढ! मूलांक 6 संयम ठेवा, मतभेद टाळा! जाणून घ्या मूलांक शास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

मासिक अंकज्योतिष सप्टेंबर 2026: मूलांक 3 करिअरमध्ये प्रगती, प्रतिष्ठेत वाढ! मूलांक 6 संयम ठेवा, मतभेद टाळा! जाणून घ्या मूलांक शास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Horoscope, September 2026: सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन होत आहे तसेच गोपाळकाला, पोळा या सणांची रेलचेलही असेल. तसेच मालव्य राजयोग, लक्ष्मी नारायण राजयोग, भद्र राजयोग, बुधादित्य राजयोगचा प्रभाव या महिन्यात सगळ्या मूलांकावर असणार आहे.

तेव्हा मूलांक 1, 3, 5 सह या मूलांकांसाठी करिअरमध्ये प्रगतीचे योग, मूलांक 2, 4 सह या मूलांकाच्या जातकांनी संयम, सावधगिरी आणि नातेसंबंध जपण्यावर भर द्यायला हवी. तुमचा मूलांक काय सांगतो? सप्टेंबर महिना कसा असेल? शुभ योगाचा प्रभाव तुमच्यावर राहणार? चला तर जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते मूलांक 9 असलेल्या लोकांना सप्टेंबर महिना कसा जाईल ते जाणून घेऊ.


September 2026 Monthly Ank Rashifal: सप्टेंबर महिन्यात लाडक्या गणरायांचे, गौरीचे आगमन होत आहे तसेच गोपाळकाला, पोळा असे सण येत आहेत. सण- उत्सावामुळे सुखसमृद्धी आणि सकारात्मकतेचा प्रभाव अधिक असेल, तसेच मालव्य राजयोग लक्ष्मी नारायण राजयोग भद्र राजयोग बुधादित्य राजयोगही जुळून येत आहेत. तेव्हा मूलांक 1 साठी आत्मविश्वास आणि नेतृत्वाच्या जोरावर कामे पूर्ण होणार, मूलांक 4 बदल स्वीकारून संयमाने पुढे जा, मूलांक 7 अडचणी कमी होऊन परिस्थिती नियंत्रणात येईल, तर मूलांक 9 साठी नशिबाची साथ तसेच थांबलेले कामे पूर्ण होणार. चला तर जाणून घेऊया, जन्मतारीखेनुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी सप्टेंबर महिना कसा असेल?मूलांक 1 - आत्मविश्वासाने काम पूर्ण करणार

मूलांक 1 च्या जातकांसाठी सप्टेंबर आत्मविश्वास, नेतृत्व आणि नवीन जबाबदाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे. नोकरी करा किंवा व्यवसाय तुमची सक्रियता आणि निर्णय घेण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असेलच शिवाय तुम्ही वेगाने निर्णय घ्याल ज्यामुळे जास्तीत जास्त काम मार्गी लागेल. वडील किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळू शकते. व्यवसाय करत असाल तर सरकारी विभाग, सरकारी संस्था किंवा मोठ्या संस्थांशी संबंधित महत्त्वाचा प्रस्ताव किंवा संधी मिळू शकते. एखाद्या योजनेवर दीर्घकाळापासून काम करत असाल तर या महिन्यात ती पुढे नेण्याची योग्य संधी मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे योग आहेत, मात्र घाईघाईने गुंतवणूक करणे टाळावे. सप्टेंबरमध्ये अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो, तेव्हा सावध राहा. तुमचा काम करण्याचा जोश आणि आत्मविश्वास चांगला आहे पण अती व्यस्ततेमुळे थकवा जाणवू शकतो. तेव्हा तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. बोलणे आणि रागावर नियंत्रण ठेवा. कारण छोट्या गोष्टीचे मोठ्या वादात रूपांतर होण्यास वेळ लागत नाही आणि ते तुमच्यासाठी घातक आहे. घरात वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि ज्येष्ठ मंडळींसोबत कायम बोलत राहा.


मूलांक 2 - आर्थिक प्रगती, आपुलकिने वागा

मूलांक 2 साठी सप्टेंबर सप्टेंबर भावनिक समतोल, कौटुंबिक सहकार्य आणि आर्थिक प्रगती घेऊन येतो आहे. आई-वडिलांकडून मदत आणि आशीर्वाद तुमच्यासाठी विशेषतः लाभदायक असतील. सामाजिक बाबतीत संपर्क वाढणार असून त्याचा लाभ भविष्यात होणार आहे. तुम्ही शिक्षण, क्रिएटीव्ह उपक्रम किंवा जनसंपर्काशी संबंधित आहात तर कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या सप्टेंबर समाधानकारक असून मिळकतीचे नवीन मार्ग खुले होतील. एखादी जुनी गुंतवणूक चांगलाचा लाभ देवू शकते. मात्र भावनेच्या भरात अनावश्यक खर्च करण्यापासून दूर राहा. कुटुंबासोबत जास्त वेळ व्यतीत करा आणि नात्यांमध्ये आपलेपणा घेवून या. ऑफिसमध्येही सहकाऱ्यांसोबत द्वेषाने किंवा रागाने वागू नका. तुम्ही आपलेपणा जपला तरच इतरजणं तुम्हाला चांगली वागणूक देतील आणि संकटात तुमच्यासोबत उभी राहतील. प्रेमसंबंधांमध्येही गोडवा कायम ठेवा.


मूलांक 3 - करिअरमध्ये प्रगती, प्रतिष्ठेत वाढ

मूलांक 3 साठी सप्टेंबरमध्ये प्रतिष्ठा, करिअरमध्ये प्रगती आणि प्रभावशाली लोकांसोबत भेटीचा योग जुळून येतो आहे. तुमच्या ज्ञानाचे आणि अनुभवाचे कौतुक होईल तसेच महत्त्वाच्या बाबतीत तुमच्याकडून सल्ला घेण्यात येईल. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. तुम्ही शिक्षण, प्रशासन, कायदा, सल्लागार किंवा कोणत्याही सरकारी संस्थेशी संबंधित असाल तर सप्टेंबरमध्ये सकारात्मक प्रगतीचे योग आहेत. नवीन शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा एखाद्या महत्त्वाच्या प्रशिक्षणाची सुरुवात करण्यासाठी वेळ चांगली आहे त्वरित पाऊले उचला. व्यवसायातही विस्ताराची योजना आखली जाऊ शकते. मात्र इतरांना सल्ला देताना सावधगिरी बाळगा. पूर्ण माहिती नसताना एखाद्या प्रकरणात मत व्यक्त केल्याने तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो. कुटुंबात तुमचा प्रभाव कायम राहील, मात्र तुमचे बोलणे खरे असे वागू नका आणि इतरांच्या बोलण्याला किंवा मताला सुद्धा प्राधान्य द्या.


मूलांक 4 - सावधगिरीसह संयमाने पुढे जा

मूलांक 4 असणाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये सावधगिरी, संयम आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जायला हवे. नोकरी असो वा व्यवसाय अचानक बदल किंवा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यासाठी तुम्हाला तुमच्या योजनेत बदल करावा लागू शकतो. तुम्ही बदल करा कारण ते तुमच्यासाठी सकारात्मक आहेत आणि तुमचा हट्टीपणा कमी करा. सरकारी कामांमध्ये विशेष सावधगिरी बाळगा. दस्तऐवज, अर्ज, कायदेशीर कागदपत्रे किंवा प्रशासकीय बाबतीत निष्काळजीपणा करू नका, कारण छोट्या चुकीमुळे विलंब किंवा अनावश्यक त्रास होऊ शकतो. आर्थिक बाबतीत पैसा येत असला तरी कोणतेही पेमेंट किंवा व्यवहार होण्यास विलंब होऊ शकतो. सप्टेंबरमध्ये एखाद्या वेळी मान-सन्मानाबाबतही संवेदनशील परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. तुमची कठोर बोलण्याने नातेसंबंध दुरावू शकतात तेव्हा नातेसंबंधातील गोडवा जपा. वडिलांच्या तब्येतीबाबत सावध राहा.


मूलांक 5 - नवीन सुरुवातीसह व्यवसायाची संधी

मूलांक 5 च्या जातकांसाठी सप्टेंबर महिना कामाच्या बाबतीत नवीन सुरुवात तसेच व्यावसायिक संधी घेवून येत आहे. ज्या कामाची तुम्ही दीर्घकाळापासून तयारी करत होतात, त्याला प्रत्यक्ष रूप देण्याची संधी मिळू शकते. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळण्याचा योग आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन प्रोजेक्ट, भागीदारी किंवा विस्ताराची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये तुमची बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता मजबूत असेल. तुमचे बोलणे आणि जनसंपर्क यामुळे लाभाचे योग जुळून येत आहेत, मात्र आर्थिक गुंतवणूक करताना विशेष सावध राहा. कोणाच्याही सांगण्यावरून पैसे गुंतवणे टाळा आणि कागदपत्र, त्यातील अटी चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतरच निर्णय घ्या. घरातील सदस्यांचा व्यवहारिक सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर असेल.


मूलांक 6 - संयम ठेवा, मतभेद टाळा

मूलांक 6 च्या जातकांसाठी सप्टेंबर ठिक असला तरी संयमाने वागण्यावर भर द्यायला हवी. नोकरी असो वा व्यवसाय तुम्हाला अशा लोकांचा सामना करावा लागू शकतो, जे तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करतील किंवा तुम्हाला वादात अडकवण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत प्रतिक्रिया देण्याऐवजी कामावर फोकस करा ते जास्त लाभदायक असेल. कुटुंबातही छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात पण तुम्ही नातेसंबंधातील गोडवा कायम ठेवा. कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात सगळ्यांना सहभागी करून घ्या. प्रेम आणि वैवाहिक संबंधांमध्ये संवाद कायम ठेवल्याने गैरसमज दूर होतील. आर्थिक स्थितीत अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. सप्टेंबरच्या अखेरीस संयमाने वागणे तसेच घर आणि ऑफिसच्या कामात समतोल साधा.


मूलांक 7 - समस्या कमी होणार, आत्मविश्वासाने काम करा

मूलांक 7 असणाऱ्यांना सप्टेंबरमध्ये काही समस्यांमधून दिलासा मिळेल तसेच हळूहळू परिस्थिती सुधारण्याचे योग आहेत. ज्या कामांबाबत दीर्घकाळापासून संभ्रम किंवा अडथळा येत होता त्यात आता प्रगती दिसेल. मात्र प्रत्येक समस्या लगेच संपणार नाही, पण परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल. घरातील ज्येष्ठ मंडळी, लहान मुले यांच्या तब्येतीबद्दल सावध राहा. सप्टेंबरमध्ये आर्थिक खर्च वाढू शकतो, ज्यामुळे मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे बोलणे तुमचे मन दुखावू शकेत पण त्यावर कठोर प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांत राहा. योगा, ध्यानधारणा किंवा मनन- चिंतन करणे तुमच्यासाठी सकारात्मक असेल. इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊन निर्णय घेण्याऐवजी स्वतःच्या समजुतीवर विश्वास ठेवणे चांगले असेल हे लक्षात ठेवा.


मूलांक 8 - मेहनत, संयम, हुशारी यशाची सुत्रे

मूलांक 8 च्या जातकांसाठी सप्टेंबर चांगला असून मेहनत, संयम आणि हुशारीमुळे कौतुकाचे योग घेवून येत आहे. एखाद्या कामाला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो पण प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण होईल. काही योजना वारंवार पुढे ढकलल्या जाऊ शकतात, मात्र तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही. सप्टेंबरमध्ये परिस्थितीत चांगली सुधारणा दिसणार आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील तसेच टीमबरोबर तुमचे संबंध अधिक चांगले होतील त्यामुळे कामात वेग असेल. तुमचे प्रोजेक्ट आणि जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करण्यावर भर द्या. आर्थिक बाबतीत अनावश्यक जोखीम घेऊ नका. जुने पेमेंट किंवा थांबलेले पेमेंट मिळण्याचा योग आहे. घरात वातावरण सुखसमाधानाचे असेल तुमच्या बोलण्यावर सगळे जण विश्वास ठेवतील. घरचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे आत्मविश्वास द्विगुणीत होईल.


मूलांक 9 - नशिबाची साथ, थांबलेल्या कामाला वेग

मूलांक 9 च्या जातकांना सप्टेंबरमध्ये नशिबाची साथ, रखडलेल्या कामांना गती आणि नवीन सुरुवात होवू शकते. खूप दिवसांपासून एखादा प्रोजेक्ट थांबला असेल तर तो पूर्ण होण्याचे मजबूत योग आहेत. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. एखाद्या नवीन प्रोजेक्टची किंवा महत्त्वाच्या कामाची सुरुवात तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा तर आहे शिवाय तुमचे आर्थिक तणाव देखील कमी होतील. थांबलेले पेमेंट मिळण्याचा योग असून त्यात सकारात्मक प्रगती होऊ शकते. तब्येत ठिक असून घरातील सदस्य तुम्हाला कामात मदत करतील. घरात जास्त वेळ व्यतीत करा त्यामुळे भावनिक बळ मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मकता कायम राहणार आहे. मात्र राग, अपशब्द बोलणे आणि चिडचिड कमी करा. तुम्ही रागावर संयमाने विजय मिळवला तर तुम्हाल जे काही हवं आहे ते नक्की मिळेल.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims