Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MH SET Exam 2026: प्राध्यापक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! महाराष्ट्र 'सेट' परीक्षेची तारीख जाहीर; जाणून घ्या परीक्षा फी आणि नियम

MH SET Exam 2026: प्राध्यापक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! महाराष्ट्र 'सेट' परीक्षेची तारीख जाहीर; जाणून घ्या परीक्षा फी आणि नियम

Savitribai Phule Pune University SET Exam Date 2026: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येणारी ४१ वी सहायक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ जुलै २०२६ रोजी होणार आहे.

या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दोन जूनपासून सुरू होणार असून, उमेदवारांना १६ जूनपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येणार आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि पणजी (गोवा) या केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी https://setexam.unipune.ac.in या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत १६ जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल. तर, विलंब शुल्कासह १७ ते १९ जूनदरम्यान अर्ज करता येणार आहेत.

MH SET exam 2026 Schedule: 'सेट'चे वेळापत्रक


परीक्षा दिनांक२६ जुलै २०२६
नियमित अर्ज प्रक्रिया२ जून ते १६ जून
विलंब शुल्कासह अर्ज१७ ते १९ जून
परीक्षा पद्धतऑनलाइन
सेंट परीक्षा परीक्षा केंद्रे
महाराष्ट्रातील १७ शहरांसह पणजी
वेबसाइट https://setexam.unipune.ac.in
संपर्क ई-मेल:set-support@pun.unipune.ac.in

MH SET 2026 exam application fees: अर्जाचे शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क ८०० रुपये असून विलंब शुल्कासह १,३०० रुपये भरावे लागणार आहेत. राखीव प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग, अनुसूचित जाती-जमाती, तृतीयपंथी आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी शुल्क ६५० रुपये असून विलंब शुल्कासह १,१५० रुपये आकारले जाणार आहेत. परीक्षा शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरता येणार आहे. अर्जाची छापील प्रत उमेदवारांनी स्वतःकडे जतन करून ठेवावी. विद्यापीठाकडे ती पाठविण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सेट परीक्षेचे माहितीपत्रक आणि अभ्यासक्रम वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. एखाद्या विषयात यापूर्वीच सेट पात्रता मिळालेल्या उमेदवाराला त्याच विषयात पुन्हा परीक्षा देता येणार नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.


Maharashtra Hybrid School: आता आठवड्यातून तीनच दिवस शाळा भरणार? स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा शाळांना मोठा प्रस्ताव

महाराष्ट्रातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये 'सहायक प्राध्यापक' बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे विद्यापीठाने आगामी ४१ व्या सेट परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims