Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MHT-CET PCM: पीसीएम ग्रुपच्या 'ऑब्जेक्शन ट्रॅकर'ची लिंक खुली! ३० मेपर्यंत ऑनलाईन आक्षेप नोंदवण्याची संधी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

MHT-CET PCM: पीसीएम ग्रुपच्या 'ऑब्जेक्शन ट्रॅकर'ची लिंक खुली! ३० मेपर्यंत ऑनलाईन आक्षेप नोंदवण्याची संधी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

CET Cell Answer Key Challenge Deadline : महाराष्ट्र राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी 'पीसीएम' गटाच्या दुसऱ्या संधीच्या परीक्षेतील प्रश्न आणि उत्तरांवर विद्यार्थ्यांना ३० मेपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत.

यासाठी २८ मेपासून विद्यार्थ्यांच्या लॉगिइनमध्ये 'ऑब्जेक्शन ट्रॅकर' सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 'पीसीएम' गटाची दुसऱ्या संधीची सीईटी परीक्षा १२ ते २० मेदरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून तीन लाख ३१ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ८५ हजार ३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेला ८८.५४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 'लॉगइन'मध्ये २८ ते ३० मे या कालावधीत 'ऑब्जेक्शन ट्रॅकर' उपलब्ध होणार आहे.

एखाद्या प्रश्नावर किंवा उत्तरावर आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने तो नोंदवता येणार आहे. प्रत्येक प्रश्न किंवा आक्षेपासाठी निर्धारित शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. ई-मेल किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून पाठवण्यात आलेल्या तक्रारी अथवा निवेदनांचा विचार केला जाणार नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीतच 'लॉगइन'द्वारे आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

Maharashtra CET 2026: १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार; 'या' तारखेपूर्वी जाहीर होणार सर्व कोर्सेसचे निकाल; सीईटी सेलची माहिती

MHT CET PCM: 'पीसीएम' गटाची दुसरी संधी

  • परीक्षा कालावधीः १२ ते २० मे २०२६
  • नोंदणी केलेले विद्यार्थी : ३३१९१७
  • परीक्षा दिलेले विद्यार्थी : २८५०३८
  • उपस्थिती : ८८.५४ टक्के
  • आक्षेप नोंदविण्याची मुदतः २८ ते ३० मे
  • सुविधा : ऑनलाइन 'ऑब्जेक्शन ट्रॅकर' द्वारे आक्षेप नोंदणी

Maharashtra Hybrid School: आता आठवड्यातून तीनच दिवस शाळा भरणार? स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा शाळांना मोठा प्रस्ताव

एमएचटी-सीईटी 'पीसीएम' गटाची दुसरी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिकेतील संभाव्य चुका दुरुस्त करण्यासाठी सीईटी सेलने २८ मेपासून 'ऑब्जेक्शन विंडो' सक्रिय केली आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims