मुंबई : आयपीएलमध्ये आजच्या डबल हेडर सामन्यांमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार आहे. या सामन्यामध्ये हिटमॅन रोहित शर्माकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ७८ धावांची तुफानी खेळी करणारा रोहित शर्माला मोठा विक्रम नावावर करण्याची संधी होता.
रोहितला फक्त चार चौकारांची गरज होती ते त्याने मारून आपल्या नावावर केला आहे. नेमका काय विक्रम जाणून घ्या.
रोहित शर्मा याने या सामन्यात ४ चौकार लगावले की त्याचे ६५० चौकार पूर्ण होणार होते. त्यासोबतच रोहित आयपीएलमध्येसर्वाधिक चौकार लगावणारा चौथा खेळाडू ठरणार आहे. या यादीमध्ये तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश असून यामध्ये विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर आहेत. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर ७७६ चौकारांसह विराट कोहली आहे. तर ७६८ चौकारांसह शिखर धवन, ६६३ चौकारांसह डेव्हिड वॉर्नर, ६५१ चौकारांसह रोहित शर्मा चौथ्या स्थानावर असून पाचव्या स्थानी ४८० चौकारांसह अजिंक्य रहाणे आहे. रोहित शर्माने २६ बॉलमध्ये ३५ धावांची खेळी केली असून यामध्येच त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. रोहित मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला असला तरी तो मुंबईकडून दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू
- विराट कोहली (आरसीबी) - ७७६ चौके
- शिखर धवन (पंजाब किंग्स) - ७६८ चौके
- डेविड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स) - ६६३ चौके
- रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) - ६४६ चौके
- अजिंक्य रहाणे (सीएसके) - ४८० चौके
या अपयशी शिलेदारांसह २२ वर्षीय समीर रिझवी याला झटपट बाद करण्याचा 'मुंबई'चा प्रयत्न असेल. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात येत समीरने अनुभवी ट्रिस्टन स्टब्ससह ११९ धावांची अभेद्य भागीदारी केली होती. बुमराहसारखा हुकूमी एक्का 'मुंबई'कडे आहे, त्यामुळे 'दिल्ली'ला प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल वर्ल्ड कप टी-२० विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यातही 'इम्पॅक्ट प्लेअर'च्या भूमिकेत असेल की, पूर्णवेळ खेळाडू म्हणून भाग घेईल याबाबत उत्सुकता आहे.

