मुंबई: मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायट्ंसचा सामना खेळवला जात आहे. वानखेडेच्या मैदानावर हा सामना सुरु आहे. मुंबईने नाणेफेक जिंकली. कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला.
आज हार्दिक पंड्या खेळत नाहीये ही अपडेट सूर्यकुमार यादवने दिली. तर मुंबईकडून आज रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करत 228 धावा केल्या. पण या सामन्यात एक अनोखे सेलिब्रेशन पाहायला मिळाले.
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रघु शर्माने सोमवारी आपल्या पहिल्या आयपीएल विकेटचा आनंद एका रहस्यमय चिठ्ठी दाखवत साजरा केला. त्याने आयपीएल 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात, पदार्पणकर्ता अक्षत रघुवंशीला बाद केले. एलएसजीच्या डावाच्या 13 व्या षटकात, रघुने स्वतःच्या गोलंदाजीवर एक सोपा झेल घेऊन आपली पहिली विकेट घेतली. आनंद साजरा करताना, त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली आणि ती स्टँड्सच्या दिशेने फिरवली. त्या चिठ्ठीवर लिहिले होते, "राधे राधे. गुरुदेवांच्या कृपेने, 15 वर्षांची अत्यंत वेदनादायक प्रतीक्षा आज संपली आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे (ब्लू अँड गोल्ड) आभार. मी नेहमीच कृतज्ञ राहीन. जय श्री राम." रघुने शानदार चार षटके टाकली. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
आयपीएल 2026 मध्ये आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या. लखनौकडून निकोलस पूरनने शानदार अर्धशतक झळकावले. पूरनने 21 चेंडूंमध्ये 8 षटकार आणि 1 चौकारासह 63 धावांची खेळी केली. मिचेल मार्शने 44 धावांचे योगदान दिले, तर हिम्मत सिंग 40 धावांवर नाबाद राहिला. मुंबईच्या बाजूने कॉर्बिन बॉशने दोन विकेट्स घेतल्या. रघु शर्मा, अल्लाह गझनफर आणि विल जॅक्सने प्रत्येकी एक विकेट काढल्या.
आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल प्लेऑफसाठी त्या संघाच्या आशा जिवंत राहतील.

